• Download App
    कोरोनाची लस घ्या अन् 14 लाख डॉलरचे घर मिळवा चकटफू !, हाँगकाँगमध्ये अनोखी ऑफर । get corona vaccine and win 14 million dollar new apartment unique vaccination offer in hong kong

    कोरोनाची लस घ्या अन् 14 लाख डॉलरचे घर मिळवा चकटफू!, हाँगकाँगमध्ये अनोखी ऑफर

    unique vaccination offer in hong kong : हाँगकाँगमध्ये लोकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी लॉटरीमध्ये अपार्टमेंटची ऑफर देण्यात येत आहे. हाँगकाँगचे डेव्हलपर कोरोना लस घेणाऱ्यांना बक्षीस म्हणून 14 लाख डॉलर्सचे अपार्टमेंट देत आहे, कारण येथील बरेच लोक लसीकरणासाठी उत्सुक नाहीत. सिनो ग्रुपची एनजी टेंग फोंग चॅरिटेबल फाऊंडेशन आणि चायनीज इस्टेट होल्डिंग्ज लिमिटेड क्वान टोंग क्षेत्रात आपल्या ग्रँड सेंट्रल प्रकल्पात नवीन अपार्टमेंट्स देत आहेत. get corona vaccine and win 14 million dollar new apartment unique vaccination offer in hong kong


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हाँगकाँगमध्ये लोकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी लॉटरीमध्ये अपार्टमेंटची ऑफर देण्यात येत आहे. हाँगकाँगचे डेव्हलपर कोरोना लस घेणाऱ्यांना बक्षीस म्हणून 14 लाख डॉलर्सचे अपार्टमेंट देत आहे, कारण येथील बरेच लोक लसीकरणासाठी उत्सुक नाहीत. सिनो ग्रुपची एनजी टेंग फोंग चॅरिटेबल फाऊंडेशन आणि चायनीज इस्टेट होल्डिंग्ज लिमिटेड क्वान टोंग क्षेत्रात आपल्या ग्रँड सेंट्रल प्रकल्पात नवीन अपार्टमेंट्स देत आहेत. लसीचे दोन्ही डोस घेणारे हाँगकाँगचे रहिवासी 449 चौरस फूट अपार्टमेंटसाठीच्या ड्रॉसाठी पात्र आहेत. सिनो ग्रुप हाँगकाँगमध्ये लिस्टेड डेव्हलपर सिनो लँड कॉर्पोरेशनची पॅरेंट कंपनी आहे.

    रोख प्रोत्साहन देण्याची चर्चा सरकारने फेटाळली

    सरकार सध्या अनयुज्ड व्हॅक्सिन डोसच्या डोनेशनसहित अनेक पर्यायांवर विचार करत आहे, कारण यापैकी काही व्हॅक्सिन ऑगस्टमध्ये एक्स्पायर होणार आहेत. हाँगकाँग सरकार लोकांना लसीकरणासाठी प्रेरित करण्यासाठी बार खुले करणे तसेच क्वारंटाइन पीरियड कमी करण्यासारख्या धोरणांवर काम करत आहे. मुख्य कार्यकारी कॅरी लॅम यांनी लसीकरणाची गती वाढवण्यासाठी कोणत्याही रोख अथवा इतर इंटेन्सिव्हची बाब फेटाळून लावली.

    केवळ 12.6% लोकांचे लसीकरण

    हाँगकाँगच्या 7.5 दशलक्ष लोकांपैकी केवळ 12.6% लोकांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे, तर त्यांच्या शेजारच्या सिंगापूरमध्ये लोकसंख्येच्या 28.3% लोकांना लस देण्यात आली आहे. हाँगकाँगमध्ये विनामूल्य अपार्टमेंटची ऑफर आकर्षक असल्याचे निश्चित आहे कारण येथे मालमत्तेचे दर खूप जास्त आहेत. न्यूयॉर्क, ओहायो, मेरिलँड, केंटकी आणि अमेरिकेतील ओरेगॉनमध्येही लकी ड्रॉची ऑफर देण्यात येत आहेत.

    get corona vaccine and win 14 million dollar new apartment unique vaccination offer in hong kong

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!