• Download App
    गे सांता आणि ख्रिसमस : नॉर्वे मधील ही पोस्टल सर्व्हिसची ऍड पहिली का? | Gay Santa and Christmas: have you seen this postal service ad of Norway?

    गे सांता आणि ख्रिसमस : नॉर्वे मधील ही पोस्टल सर्व्हिसची ऍड पहिली का?

    विशेष प्रतिनिधी

    नॉर्वे : 1981 मध्ये नॉर्वेत सेम सेक्स मॅरेज लीगल करण्यात अाले हाेते. तर आता हा लॉ पास होऊन 50 वर्षं पूर्ण झालेली आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने पोस्टन नॉर्वे तर्फे एक अॅड यू ट्युबवर प्रदर्शित करण्यात आली आहे. पोस्टल नॉर्वे ही नॉर्वेमधील एक पोस्टल सर्व्हिस कंपनी आहे.

    Gay Santa and Christmas: have you seen this postal service ad of Norway?

    या अॅडमध्ये एक व्यक्ती ज्याचे नाव हॅरी आहे. त्याला दरवर्षी सांता गिफ्ट द्यायला जात असतो असे दाखवण्यात आले आहे. एका ख्रिसमसला दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण सांता लगेच निघून जातो. असं दरवर्षीच सांता हॅरीला गिफ्ट देऊन जातो. असं प्रत्येक वर्षी वर्षातुन फक्त एक दिवस हे दोघे एकमेकांना भेटत असतात.


    LGBTQ कम्युनिटीसाठी मॅचमेकिंग सर्व्हिस शादी.कॉम सुरू करणार


    म्हणून हॅरी एका ख्रिसमसच्याआधी सांताला पत्र लिहितो की, या ख्रिसमसला मला काही नको पण फक्त तू हवा आहेस. आणि तेव्हा ते दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटतात, चांगला टाइम स्पेंड करतात असे या अॅडमध्ये दाखवण्यात आले आहे. नॉर्वेमध्ये ही ऍड मागील दोन आठवड्यांपासून झळकत आहे. इंटरनेटवर देखील ही ऍड प्रचंड व्हायरल झालेली आहे.

    बरेच लोक या ऍडच्या विरूध्द बोलत आहेत की सांता गे कसा असू शकतो? अशाप्रकारच्या अनेक टीका होताना दिसून येत आहेत. तर बरेच लोक असेही आहेत जे म्हणताहेत की प्रेमाला चांगले दिवस येणार आहेत.

    या अॅडमध्ये 1981 सालापासून नॉर्वेमध्ये सेम सेक्स मॅरेज कायदेशीर आहे याची आठवण करत ‘सेलिब्रेटींग 50 इयर्स ऑफ एलजीबीटीक्यू’ असे देखील सांगण्यात आले आहे.

    Gay Santa and Christmas: have you seen this postal service ad of Norway?

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार