• Download App
    अमेरिकेच्या होंडुरास तुरुंगात गँगवॉर; गोळीबार आणि जाळपोळीत 41 महिला कैद्यांचा मृत्यू|Gangwar in US Honduras Prison; 41 women prisoners died in firing and arson

    अमेरिकेच्या होंडुरास तुरुंगात गँगवॉर; गोळीबार आणि जाळपोळीत 41 महिला कैद्यांचा मृत्यू

    वृत्तसंस्था

    होंडुरास : होंडुरासमधील महिला तुरुंगात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी कारागृहात 41 महिला कैद्यांचा मृत्यू झाला. बेकायदेशीर कारवायांवरून दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात कैद्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.Gangwar in US Honduras Prison; 41 women prisoners died in firing and arson

    होंडुरासच्या राष्ट्रीय पोलीस तपास संस्थेचे प्रवक्ते युरी मोरा यांनी या संपूर्ण घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बहुतेकांचा जळाल्याने मृत्यू झाला आहे. युरी मोराने सांगितले की, काहींना गोळ्याही लागल्या आहेत.



    होंडुरासच्या राष्ट्रीय पोलिस तपास संस्थेचे प्रवक्ते युरी मोरा यांनी सांगितले की, पीडितांपैकी 26 जणांना जाळून मारण्यात आले आणि काहींना गोळ्या घालण्यात आल्याचे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.

    त्यांनी सांगितले की, ही घटना होंडुरासची राजधानी टेगुसिगाल्पाच्या वायव्येस सुमारे 30 मैल (50 किलोमीटर) तामारा तुरुंगात घडली. गंभीर जखमी झालेल्या महिला कैद्यांवर तेगुसिगाल्पा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    देशाच्या तुरुंग यंत्रणेच्या प्रमुख ज्युलिसा विलानुएवा यांनी या संपूर्ण घटनेवर दुःख व्यक्त केले असून दंगलीत सहभागी असलेल्या संघटित टोळीवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. कारागृहातील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी कठोर प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळेच हा संघर्ष झाला.

    Gangwar in US Honduras Prison; 41 women prisoners died in firing and arson

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Trump said : ट्रम्प म्हणाले- आम्ही भारत-पाक अणुयुद्ध रोखले; दोन्ही देशांना समजावले; दोघांनीही सहमती दर्शवली

    व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

    Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनला चर्चेची ऑफर; युरोपीय देशांच्या धमकीनंतर आला प्रस्ताव