• Download App
    वेगाने होणाऱ्या पृथ्वीवरील हवामान बदलांचा साक्षीदार ठरला फ्रेंच अंतराळवीर थॉमस पेस्केट! भविष्याबद्दल व्यक्त केली चिंता | French astronaut Thomas Pescat witnesses rapid climate change ! Concerned about the future

    वेगाने होणाऱ्या पृथ्वीवरील हवामान बदलांचा साक्षीदार ठरला फ्रेंच अंतराळवीर थॉमस पेस्केट! भविष्याबद्दल व्यक्त केली चिंता

    विशेष प्रतिनिधी

    फ्रान्स : फ्रेंच अंतराळवीर थॉमस पेस्केट यांने पृथ्वीच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. थॉमस नुकताच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून आपले दुसरे मिशन पूर्ण करून पृथ्वीवर परत आला आहे. पृथ्वीपासून एका ठरावीक अंतरावर पृथ्वीवर घडणार्या नैसर्गिक घटनांचा त्याने मागील सहा महिने अभ्यास केला. यामध्ये जंगलात लागलेल्या आगीपासून ते चक्रीवादळ या सर्व नैसर्गिक आपत्तीचा तो साक्षीदार ठरला.

    French astronaut Thomas Pescat witnesses rapid climate change ! Concerned about the future

    मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या मिशनमुळे पृथ्वीच्या अविश्वसनीय घटना त्याला पाहता आल्यात. जंगलातील आग धुराचे लोट, धुराचे स्तंभ तो दिवसेंदिवस अंतराळातून पाहत होता. या नैसर्गिक घटनांमधून बाहेर पडणार्या ऊर्जेवर जितके भाळून जायला होते तितकेच पृथ्वीवर झालेल्या नुकसानीचा विचार केल्यास चिंता वाटल्यावाचून राहत नाही असे थॉमस यांने म्हटले आहे.


    SpaceX Inspiration4 : तीन दिवस अंतराळात घालवून रचला नवा विक्रम, स्पेसएक्सचे चार हौशी अंतराळवीर पृथ्वीवर परतले


    तो म्हणतो, अंतराळातून दिसणारे चक्रीवादळे, जंगलातील आग यापूर्वी मी कधीही पाहिली नव्हती. पाच वर्षांपूर्वी मी जेव्हा आणखी एका मिशनवर अंतराळात गेलो होतो, त्यावेळी अशा कोणत्याही घटनांचा मी पहिल्या नव्हत्या. पण मागील सहा महिन्यांमध्ये या नैसर्गिक आपत्तींचा आम्ही अभ्यास केला आहे.

    नद्यांचे प्रदूषण, शेतीयोग्य जमीन उध्वस्त होणे, वायू प्रदूषण, हिमनद्या वितळणे, अॅमेझॉन रेनफॉरेस्ट तोडणे, हे सर्व स्पेस स्टेशनवरून पाहिले जाऊ शकते.

    COP26 च्या आधी आपली भीती व्यक्त करताना थॉमस अंतराळवीर म्हणतो की सतत होणारे हे बदल यावरून हे स्पष्ट होते भविष्य सुरक्षित करणे अति गरजेचे आहे.

    French astronaut Thomas Pescat witnesses rapid climate change ! Concerned about the future

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत