पॅरिस – ऑस्ट्रेलियाने अमेरिका व ब्रिटनच्या सहकार्याने आण्विक ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीसाठी नवा करार केला आहे. या करारावरून फ्रान्सने संताप व्यक्त करीत अमेरिका व ऑस्ट्रेलियातून राजदूतांना परत बोलाविले आहे.
डिझेलवरील पाणबुडी निर्मितीसाठी फ्रान्स् आणि ऑस्ट्रेलियामध्ये १०० अब्ज डॉलरचा सौदा झाला होता.France withdraw ambassadors from USA
पण नव्या ‘ऑकस’ करारातील शर्तींनुसार ऑस्ट्रेलियासाठी हा सौदा रद्द होणार आहे. यामुळे ६५ अब्ज डॉलरचे नुकसान होणार असल्याने फ्रान्स नाराज आहे.फ्रान्सने अमेरिकेतील राजदूतांना परत बोलाविण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातील राजदूतांनाही मायदेशी परतण्याचा आदेश दिला आहे.
‘ऑस्ट्रेलियाने अब्जावधी डॉलरचा करार मोडून धोका दिला आहे, असे सांगत असे करणे म्हणजे पाठीत सुरा भोसकण्यासारखे आहे, अशी तिखट प्रतिक्रियाही व्यक्त केली. आशिया-प्रशांत सुरक्षा आघाडी तयार करताना अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने फ्रान्सला वगळले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने केलेल्या कराराच्या घोषणेकडे अत्यंत गंभीरतेने पाहत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या आदेशानुसार दोन्ही देशातून राजदूत परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे, असे फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जिन इव्हज ली डुरिनो यांनी सांगितले.
France withdraw ambassadors from USA
महत्त्वाच्या बातम्या
- इस्रोची दारे आता खासगी स्टार्टअपसाठी खुली, अग्निकुल’, ‘स्कायरूट’शी सामंजस्य करार
- पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचे ढोल- ताशाचे वादन थांबवले; अखेर चर्चेअंती विसर्जन
- अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये बाँबस्फोटात तीन ठार, तालिबान राजवटीला इसिसचा इशारा
- अजितदादा नगरसेवक फोडताहेत!!; ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-चिंचवडचे??; चंद्रकांत दादांचा खोचक सवाल