Explosion In Balochistan : बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे हॉटेल पार्किंगमध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 4 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानचे पोलीस महानिरीक्षक ताहिर राय यांनी या स्फोटाची माहिती माध्यमांना दिली. चिनी राजदूत बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथील लक्झरी हॉटेलमध्ये आपल्या प्रतिनिधींसमवेत राहत होते. दरम्यान, हॉटेल पार्किंगमध्ये स्फोट झाला. Four People Killed And 13 Others Injured In An Explosion In Balochistan by Tehrik E Taliban
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे हॉटेल पार्किंगमध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 4 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानचे पोलीस महानिरीक्षक ताहिर राय यांनी या स्फोटाची माहिती माध्यमांना दिली. चिनी राजदूत बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथील लक्झरी हॉटेलमध्ये आपल्या प्रतिनिधींसमवेत राहत होते. दरम्यान, हॉटेल पार्किंगमध्ये स्फोट झाला. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद म्हणाले, “या घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाले आहेत.” मात्र, या स्फोटाच्या वेळी चिनी राजदूत बाहेर होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार एका वाहनात आयईडी लावून स्फोट घडवल्याचे समोर आले आहे.
गंभीर जखमी झालेल्या दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा स्फोट झाल्याचे सांगितले. या घटनेच्या चौकशीसाठी हॉटेल कॉम्प्लेक्स बंद ठेवण्यात आले असून तेथे दहशतवादविरोधी विभाग तैनात करण्यात आला आहे.
तहरिक-ए-तालिबानने घेतली जबाबदारी
हल्ल्याच्या काही तासांनंतर पाकिस्तानी तालिबान्यांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचा दावा करत स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तानी तालिबान किंवा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान हा अफगाण तालिबानांपासून वेगळा झालेला बंडखोर गट आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी अझर अक्रम यांनी सांगितले की, हॉटेल पार्किंगच्या ठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता की नाही, हे जाणून घेण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत. इतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, कार पार्किंग क्षेत्रात काही मिनिटांनंतर बॉम्बचा स्फोट झाला आणि हा हल्ला आत्मघातकी होता की नाही, याचा अधिकारी तपास करत आहेत.
Four People Killed And 13 Others Injured In An Explosion In Balochistan by Tehrik E Taliban
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना संकटात भारताचे हवाई दल आले धावून, एअरलिफ्ट करून ऑक्सिजन- औषधांचा देशभरात पुरवठा सुरू
- दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री एके वालिया यांचे कोरोनामुळे निधन, अपोलो रुग्णालयात सुरू होते उपचार
- Corona Updates In India : कोरोनाच्या बाबतीत जगभरातील रेकॉर्ड मोडले, एका दिवसात भारतात 3.15 लाख नवे रुग्ण, अमेरिकेलाही टाकले मागे
- CPM नेते सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनामुळे निधन, गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- ‘बावीस गेले, अजून किती?’ नाशिक दुर्घटनेवर डॉ. अमोल अन्नदातेंची अंतर्मुख करायला लावणारी कविता