• Download App
    तब्बल 41 दिवसांनंतर अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमोरुला सालेह परतले! पाकिस्तानवर केली टीका | Former Vice President of Afghanistan Amorullah Saleh returns after 41 days! Criticism of Pakistan

    तब्बल 41 दिवसांनंतर अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमोरुला सालेह परतले! पाकिस्तानवर केली टीका

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : अफगाणिस्तान देश तालिबान राजवटीने ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमोरुला सालेह तब्बल 41 दिवसांनंतर ट्विटरवर परत आले आहेत. मध्ये त्यांनी आपले अकाउंट बंद केले होते. आपल्या ट्विट द्वारे त्यांनी पाकिस्तानविरोधी आपली भूमिका मांडली आहे. तसेच अफगाणिस्तानच्या सद्य परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे.

    Former Vice President of Afghanistan Amorullah Saleh returns after 41 days! Criticism of Pakistan

    आपल्या ट्विटमधून त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. अफगाणिस्तानची सध्याची दयनीय अवस्था देखील मांडली आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणतात, मागील दीड महिन्यांमधील अफगाणिस्तानचा जीडीपी 30 टक्क्यांनी तरी कमी झाला आहे. दारिद्र्य पातळी 90 टक्के. शरीयतच्या नावाखाली महिलांची घरगुती गुलामगिरी सुरू आहे. प्रेस, मीडिया अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आहेत. शहरातील मध्यमवर्ग निघून गेला आहे. बँक रिकाम्या आहेत. हा अहवाल सालेह यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.


    AFGANISTAN : तालिबानची कथनी एक करनी एक : शांततेचे आश्वासन देऊन तालिबानचा काबूल विमानतळावर महिला आणि मुलांवर हल्ला


    पाकिस्तानवर हल्ला चढवताना त्यांनी म्हटले, पाकिस्तानी लष्करी आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात गुंतले आहेत. अफगाणिस्तानच्या परदेशी आणि सुरक्षेची संबधित निर्णय आता रावळपिंडी मधून घेतले जात आहेत. अफगाणिस्तान मधील राजकीय महत्त्व असलेले ठिकाण दोहा येथे हलवण्यात आले आहे. अफगाणिस्तान खूप मोठा देश आहे जो पाकिस्तान मिळऊ पाहतोय. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.

    आम्ही या सर्व गोष्टींना विरोध करू जेणेकरून पाकिस्तानी अधिपत्य पासून अफगाणिस्तानचे संरक्षण करु. अफगाणिस्तानचा उदय नक्कीच लिहू. असे सालेह यांनी म्हटले आहे.

    Former Vice President of Afghanistan Amorullah Saleh returns after 41 days! Criticism of Pakistan

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या