• Download App
    Flood in China in dangerous mood

    चीनमध्ये महापुराचे थैमान सुरूच, ३० लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग – चीनमध्ये महापुराचे थैमान सुरूच असून हेनान प्रांतात सुमारे ३० लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. गेल्या एक हजार वर्षातील सर्वाधिक पाऊस म्हणून चीनच्या वेधशाळेने नोंद केली आहे.Flood in China in dangerous mood

    मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे सुमारे २१५,२०० हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. या नासाडीमुळे सुमारे १८८.६ दशलक्ष डॉलर आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. हेनान प्रांताची राजधानी झेनग्झू येथील सब वे स्थानकात पाणी शिरल्याने १२ जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले.



     

    या घटनेचे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सब वे मध्ये अडकलेले प्रवासी हँडलबारला पकडून मदतीची मागणी करताना दिसतात. यावेळी घटनास्थळी पोचलेल्या बचाव पथकाने काही जणांना वाचवले.

    धरण फोडल्याने संपूर्ण झेनग्झू शहरात पाणी साचले आहे. शहरातील सुमारे दीड लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. काही जण कार्यालयात तर काही जण हॉटेलमध्ये थांबले आहेत. रेल्वेसेवा, बस सेवा आणि विमानसेवा बंद करण्यात आली आहे. सुमारे २६० उड्डाणे रद्द केली आहेत. तर १६० रेल्वेगाड्या रद्द केल्या.

    Flood in China in dangerous mood

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या