• Download App
    Sudan Crisis : ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी जेद्दाहकडे रवाना!First batch of stranded Indians leave Sudan under Operation Kaveri

    Sudan Crisis : ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी जेद्दाहकडे रवाना!

    सुदानमधून सुखरूप बाहेर पडलेल्या नागरिकांनी मानले भारत सरकारचे आभार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी भारतीय नौदलाच्या जहाजातून जेद्दाह, सौदी अरेबियासाठी रवाना झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी (२५ एप्रिल) ही माहिती दिली. हिंसाचारग्रस्त सुदानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने सोमवारी ऑपरेशन कावेरी सुरू केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी INS सुमेधावरील भारतीयांचे फोटो ट्विट केले आहेत. यावेळी नागरिकांनी त्यांना सुदानमधून सुखरूप बाहेर काढल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आणि हातात तिरंगा घेतलेला दिसत होता. First batch of stranded Indians leave Sudan under Operation Kaveri

    अरिंदम बागची यांनी ट्विट केले की, “ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी रवाना झाली. INS सुमेधा 278 जणांसह पोर्ट सुदानहून जेद्दाहला जात आहे.” सुदानमधून आलेल्या या लोकांमध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे.   हिंसाचारग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून भारताने जेद्दाह येथे दोन C-130J लष्करी वाहतूक विमाने आणि पोर्ट सुदान येथे INS सुमेधा तैनात केली आहे.

    सुदानमध्ये भयंकर युद्ध सुरू –

    जेद्दाहला पोहोचल्यानंतर भारतीयांना मायदेशी आणले जाईल. संपूर्ण सुदानमध्ये सुमारे 3,000 भारतीय आहेत. सुदानची राजधानी खार्तूममध्ये अनेक ठिकाणी जोरदार लढाई झाल्याच्या वृत्तामुळे सुदानमधील सुरक्षा परिस्थिती अस्थिर आहे. गेल्या 10 दिवसांपासून येथे लष्कर आणि निमलष्करी गट यांच्यात झालेल्या भीषण संघर्षात 400 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

    First batch of stranded Indians leave Sudan under Operation Kaveri

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या