Taliban hanging somebody from an American Blackhawk : सोमवारी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने संपूर्ण माघार घेतल्यानंतर, संपूर्ण जगाच्या नजरा आता तालिबानवर आहेत. अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून घाईघाईने अशा प्रकारे बाहेर पडले की, त्यांनी आपले अब्जावधी डॉलर्सची शस्त्रेही मागे सोडून दिली. Fact Check Video it looks like the Taliban hanging somebody from an American Blackhawk
वृत्तसंस्था
कंधार : सोमवारी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने संपूर्ण माघार घेतल्यानंतर, संपूर्ण जगाच्या नजरा आता तालिबानवर आहेत. अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून घाईघाईने अशा प्रकारे बाहेर पडले की, त्यांनी आपले अब्जावधी डॉलर्सची शस्त्रेही मागे सोडून दिली.
अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या क्रूर कृत्य म्हणत एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. या व्हिडिओत एका व्यक्तीला फासावर लटकावून त्याला हेलिकॉप्टरला बांधून शहरभर फिरवले जात असल्याचे सांगितले जात आहे. परंतु खरंच असं घडलंय का? अनेक ट्वीटर युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला असून तो वेगाने व्हायरल होत आहे.
काय घडलं नेमकं?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवरून आता अनेकांनी खुलासा केला आहे. या व्हिडिओत हेलिकॉप्टरला लटकलेली व्यक्ती जिवंत असल्याचे दिसून येते. ही व्यक्ती कंधारमधील एका इमारतीवर हेलिकॉप्टरच्या मदतीने झेंडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. हे हेलिकॉप्टर अमेरिकन ब्लॅकहॉकच आहे, जे अफगाणी सैन्याकडून तालिबानने हस्तगत केले आहे. या घटनेचे आणखी काही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यात ही व्यक्ती खालच्या लोकांना हात उंचावून दाखवत आहे. जो झेंडा लावण्यासाठी हा तालिबानी हेलिकॉप्टरला लटकला होता, अखेरीस त्याला तो काही लावताच आला नाही.
माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकन सैन्याने माघारी घेतल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानची दहशत इतकी वाढली आहे की, आता ते अमेरिकन शस्त्रे आणि अमेरिकन लष्कराची हेलिकॉप्टर उडवत आहेत, पण इतक्या भयंकर कृत्याचा कोणीही विचार केला नव्हता.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. लोक प्रश्न विचारत आहेत, हे हेलिकॉप्टर कोण उडवत आहे? तालिबानी अतिरेकी अमेरिकेचे सर्वात प्रसिद्ध हेलिकॉप्टर चालवण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित आहेत का? याआधीही अनेक व्हिडिओ आणि फोटोंमध्ये तालिबानी अतिरेक्यांना अफगाण सैन्याच्या हेलिकॉप्टर आणि विमानांसह पाहिले गेले आहे.
त्याच वेळी, अमेरिकन अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर सुमारे 28 अब्ज डॉलर्सची शस्त्रे जप्त केली आहेत. ही शस्त्रे अमेरिकेने 2002 ते 2017 दरम्यान अफगाण सैन्याला दिली होती. एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जी शस्त्रे नष्ट झाली नाहीत, ती आता तालिबानच्या ताब्यात आहेत.
Fact Check Video it looks like the Taliban hanging somebody from an American Blackhawk
महत्त्वाच्या बातम्या
- No GST on Papad : ‘गोल पापडांवर जीएसटी नाही, पण चौकोनी पापडांवर लागू!’ हर्ष गोयंका यांच्या ट्विटवर आता CBIC चे स्पष्टीकरण
- पाकिस्तानात ऐन जन्माष्टमीदिवशीच श्रीकृष्णाच्या मंदिरावर हल्ला; भाविकांना बेदम मारहाण
- पाकिस्तानात ऐन जन्माष्टमीदिवशीच श्रीकृष्णाच्या मंदिरावर हल्ला; भाविकांना बेदम मारहाण
- जम्मू -काश्मीर : सदरा बाग वनक्षेत्रात सीआरपीएफने अनेक शस्त्रांसह ग्रेनेड जप्त
- नोएडातील दोन चाळीस मजली टॉवर पाडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, नियमबाह्य बांधकाम करणाऱ्या सुपरटेकला तडाखा