विशेष प्रतिनिधी
लंडन – तालिबानचे नेते घोषणा करण्यासाठी फेसबुक आणि ट्विटरसारख्या समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे आढळून आल्यानंतर या बड्या कंपन्या सावध झाल्या आहेत.Face Book bans Taliban for information sharing
फेसबुकने आता तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित मजकूर व्हायरल करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तालिबानशी संबंधित मजकुरावर लक्ष ठेवण्याबरोबरच तो हटविण्यासाठी फेसबुकने एक वेगळी टीमच तयार केली आहे.
स्थानिक दारी आणि पश्तून भाषेची माहिती असणारे लोक नेमण्यात आले असून ते स्थानिक कंटेटवर लक्ष ठेवण्याचे काम करतील. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपला देखील हेच धोरण लागू करण्यात आले आहे.
अमेरिकी कायद्यानुसार तालिबानवर बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेकडून चालविण्यात येणारी अकाउंट हटविण्यात येतील तसेच त्यांची स्तुती करणारा, त्यांना पाठिंबा देणारा मजकूर काढून टाकण्यात येईल, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले.
Face Book bans Taliban for information sharing
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र ठरले एक कोटी जनतेला दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य
- राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल
- ‘पेगॅसस’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दिलासा, संवेदनशील माहिती देण्याची गरज नाही
- राष्ट्रीय महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी नेट्टा डिसूझा, सुस्मिता देव यांनी राजीनामा दिल्याने घाईघाईत नियुक्ती