वृत्तसंस्था
सिडनी : ऑस्ट्रेलियाला महापुराचा फटका बसला आहे. हा दशकातील सर्वात भीषण पूर आहे. पुरामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला.Extreme levels of flood danger were announced in at least two places in Australia. 21 betrayed
क्वीन्सलँडमधील मुसळधार पावसापासून पुराला सुरुवात झाली. तीन दिवसपाऊस कोसळल्याने ब्रिस्बेनचे ७० टक्के क्षेत्र जलमय झाले. दक्षिणेतील सर्वात मोठ्या न्यू साऊथ वेल्समध्ये प्रचंड पाऊस झाला. सिडनीतील सुमारे पाच लाख लोकांना घरेदारे सोडावी लागली.
सिडनीमध्ये मंगळवारपर्यंत ८२.१६ सेंमी पाऊस झाला. वर्षाच्या सुरुवातीस पावसाचा हा विक्रम ठरला आहे. ६६ वर्षांत एवढा पाऊस झाला नाही. १९५६ मध्ये एवढ्या पावसाची नोंद झाली होती. यंदा सुरुवातीला ५० हजारांवर लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना करण्यात आली होती.
मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या. सिडनीच्या उत्तरेकडील भागात एक डझनाहून जास्त नागरिकांचा बुडून मृत्यू झाला. सिडनीत बुधवारपर्यंत पाऊस मुक्कामी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.