• Download App
    भारत आणि बेने इस्रायलींची नाळ एकचExternal affairs minister S Jaishankar on Sunday interacted with the Indian Jewish community in Israel and said that the community has been, "an umbilical cord" that nourished ties between India and Israel.

    भारत आणि बेने इस्रायलींची नाळ एकच

    जगाच्या पाठीवर भारत हा असा एकमेव देश आहे जिथे पँलेस्टाईनमधून पळवून लावलेल्या ज्यूंना प्रेमाने आसरा देण्यात आला. पाश्चिमात्य राष्ट्रांनी ज्यूंवर अत्याचार केलेले असताना भारतात मात्र ज्यू सहजपणे सामावून गेले. हेच नाते दृढ करण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. External affairs minister S Jaishankar on Sunday interacted with the Indian Jewish community in Israel and said that the community has been, “an umbilical cord” that nourished ties between India and Israel.


    वृत्तसंस्था

    जेरुसलेम : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी इस्रायलमधील भारतीय ज्यू समुदायाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इस्रायलच्या जडणघडणीवर भारतीय ज्यूंनी टाकलेल्या मोठ्या प्रभावाचे कौतुक केले.

    जयशंकर म्हणाले की, बेने इस्रायलीं आणि भारतीयांची नाळ एकच असून त्यांनी भारत आणि इस्रायलमधील संबंध दृढ केले आहेत. जयशंकर यांनी रविवारी इस्रायलच्या तीन दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात ते इस्रायली राष्ट्राध्यक्ष इसहाक हर्जोग, पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड यांची भेट घेतील.

    परराष्ट्र मंत्री म्हणाले की, भारतीय ज्यू समुदायाने भारतातील अनेक चवी इस्रायलमध्ये नेल्या, टिकवल्या. “मला सांगण्यात आले आहे की बेने इस्रायलींनी बनवलेली विशिष्ट मलिदा थाळीने आणि मलिद्याने आता अधिकृतपणे इस्रायलींच्या दैनंदिन जीवनात स्थान मिळवले आहे. त्याचप्रमाणे, बेने इस्रायलींच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातावरील मेहंदी, बाट पुक्काची प्रथा यांचाही समावेश बगदादी ज्यूंच्या विवाह सोहळ्यांमध्ये झाला आहे. चमेलीच्या माळा आणि कोचिनी ज्यूंच्या मनाराचा उपयोग आता तोराहच्या तारकांना सुशोभित करण्यासाठी केला जाते,” असे जयशंकर म्हणाले.

    “तुम्ही सभास्थानात प्रवेश करण्यापूर्वी शूज काढण्याची भारतीय परंपरा देखील स्वीकारली आहे. तुम्ही सर्वांनी आपली जीवनपद्धती, आपली भाषा, आपले सण या बद्दल सांगिते. इस्रायलमध्ये अनेक वर्षे चालवल्या जाणाऱ्या मराठीतील मायबोली जर्नलबद्दल माल सांगितले जाते,” असेही ते पुढे म्हणाले. ओणम, होळी आणि दिवाळी हे सण इस्रायलमध्ये ज्यूंच्या पुरीम आणि हनुक्का इतक्याच उत्साहाने साजरे केले जातात, असेही जयशंकर यांनी सांगितले.

    सांस्कृतिक आणि धार्मिक अशा दोन्ही संस्कृतींच्या बाबत भारत आणि इस्रायल यांच्यातील प्राचीन संबंधांचा हवाला जयशंकर यांनी दिला. भारतीय ज्यूंनी भारताच्या राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेत दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक करत बेने इस्रायलींचे वर्णन “आपल्यापैकी एक” असे केले.

    जेरुसलेमशी भारताचे संबंध 800 वर्षांपूर्वीचे आहेत. आमचे एक आदरणीय सूफी संत बाबा फरीद यांनी जेरुसलेममधील शहराच्या भिंतींच्या आत एका गुहेत ध्यान केले. हे ठिकाण नंतर भारतातील प्रवाशांसाठी एक तीर्थस्थान आणि तीर्थक्षेत्र बनले आहे, असेही जयशंकर म्हणाले. निस्सीम इझेकील यांच्यासारख्या साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित साहीत्यिकाने भारताच्या साहित्यात भर टाकल, असेही त्यांनी सांगितले.

    “इस्रायलमधील भारतीय ज्यू समुदायाला भेटून खूप आनंद झाला. भारत-इस्रायल संबंधांमध्ये त्यांच्या बहुविध योगदानाचे मोल आहे. येत्या काही वर्षांमध्ये ते आम्हाला आणखी जवळ आणतील,” असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.

    दरम्यान, जयशंकर यांच्या इस्रायल भेटीचा मूळ हेतू इस्रायलमधील नव्या आघाडी सरकारशी संबंध जोडणे आणि भारत-इस्रायल यांच्यातील संबंधांना चालना देणे असा आहे. भारताचे इस्रायलशी घनिष्ठ सुरक्षा संबंध आहेत. अत्याधुनिक ड्रोन, दारुगोळा, रडार, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि सीमा सेन्सर यांची मदत इस्रायलकडून घेतली जाते. जुलै 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायल दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. या दौऱ्यात त्यांनी इस्रायल-भारत द्विपक्षीय संबंध बळकट केले.

    External affairs minister S Jaishankar on Sunday interacted with the Indian Jewish community in Israel and said that the community has been, “an umbilical cord” that nourished ties between India and Israel.

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या