External Affairs Minister : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी येथील व्यापारी समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी जयशंकर म्हणाले, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात भक्कम भागीदारीची नितांत आवश्यकता आहे. यादरम्यान जयशंकर यांनी अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्रातील नेत्यांना सांगितले की, सध्या भारताची प्राधान्ये कोणती आहेत आणि त्यास यापेक्षा अधिक कशाची आवश्यकता आहे. External Affairs Minister Emphasised Stronger India US Health Partnership To Fight The COVID Pandemic
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी येथील व्यापारी समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी जयशंकर म्हणाले, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात भक्कम भागीदारीची नितांत आवश्यकता आहे. यादरम्यान जयशंकर यांनी अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्रातील नेत्यांना सांगितले की, सध्या भारताची प्राधान्ये कोणती आहेत आणि त्यास यापेक्षा अधिक कशाची आवश्यकता आहे.
पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करा
जयशंकर म्हणाले, कोरोनाशी सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने एकत्रितपणे पुरवठा साखळीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आम्हाला लस उत्पादन आणि इतर औषधांवर लवकरच सहमती मिळावी अशी आमची इच्छा आहे. जयशंकर यांनी बुधवारी अमेरिकी सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. जयशंकर यांना भेटलेल्यांमध्ये यूएस ग्लोबल टास्क फोर्स ऑफ पेंडमिक रिलीफचे अधिकारीही होते. याबाबत भारतीय दूतावासानेही ट्विट केले आहे.
अमेरिकन कंपन्यांचे आभार
जयशंकर यांनी बैठकीत अमेरिकन कंपन्यांच्या सीईओंचे आभार मानले. ते म्हणाले की, कठीण काळात त्यांनी भारताप्रति जबाबदारी निभावली आहे. या सर्वांनी भारत-अमेरिका व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीवरही लक्ष केंद्रित केले आहे. हे दोन्ही देशांमधील विश्वास आणि मजबूत संबंध दर्शवते. तत्पूर्वी, भारत-यूएस बिझनेस कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनी जयशंकर यांना हा माल भारतात पाठविला जात आहे आणि इतर मदतीबद्दल सविस्तर माहिती दिली. यूएस चेंबर ऑफ कॉमर्सनेही सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.
External Affairs Minister Emphasised Stronger India US Health Partnership To Fight The COVID Pandemic
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींचा ओडिशा-बंगालमधील ‘यास’ चक्रीवादळ बाधित भागाचा दौरा, आढावा बैठकीत ममतांचाही सहभाग
- भारताला सोपवण्याएवेजी फरार मेहुल चौकसीला अँटिग्वाला परत देणार डोमिनिका सरकार
- बिनबुडाच्या बातम्या देऊ नका, न्यूयॉर्क टाईम्सला केंद्राने खडसावले
- विजय वडेट्टीवार यांनी शासकीय समितीचा फार्स करून दारुबंदी उठविली, पद्मश्री अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांची टीका
- तेलगू देशमला मतासाठी पाच कोटींची लाच, तेलंगणातील वोटच्या बदल्यात नोट प्रकरणात आरोपपत्र दाखल