• Download App
    इक्वेडोरच्या तुरुंगात गँगवॉर, बंदुका- चाकूने हल्ला, भीषण बॉम्बस्फोटही घडले, आतापर्यंत 24 ठार । Ecuador violent riots between two gangs in prison 24 killed 48 other injured says police

    इक्वेडोरच्या तुरुंगात वाहिले रक्ताचे पाट, गँगवॉरमध्ये बंदुका-चाकूने हल्ला, भीषण बॉम्बस्फोटही घडवले, आतापर्यंत 24 ठार

    Ecuador violent riots : दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमधील तुरुंगात हिंसक संघर्ष उडाला, यात 24 कैद्यांचा मृत्यू झाला आणि 48 जखमी झाले. येथील समुद्रकिनाऱ्यावरील ग्वायाकिल येथील द्वीपकल्प तुरुंगात मंगळवारी मोठी हाणामारी झाली. इक्वाडोरच्या कारागृह प्रशासनाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पोलीस आणि लष्कराला पाच तासांनंतर ग्वायाकिल प्रादेशिक कारागृहातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. ग्वायाचे राज्यपाल पाब्लो आरोसेमेना यांनी तुरुंगाबाहेर एका पत्रकार परिषदेत सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. Ecuador violent riots between two gangs in prison 24 killed 48 other injured says police


    वृत्तसंस्था

    ग्वायाकिल : दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमधील तुरुंगात हिंसक संघर्ष उडाला, यात 24 कैद्यांचा मृत्यू झाला आणि 48 जखमी झाले. येथील समुद्रकिनाऱ्यावरील ग्वायाकिल येथील द्वीपकल्प तुरुंगात मंगळवारी मोठी हाणामारी झाली. इक्वाडोरच्या कारागृह प्रशासनाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पोलीस आणि लष्कराला पाच तासांनंतर ग्वायाकिल प्रादेशिक कारागृहातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. ग्वायाचे राज्यपाल पाब्लो आरोसेमेना यांनी तुरुंगाबाहेर एका पत्रकार परिषदेत सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

    अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंसक चकमकीत गोळ्या झाडल्या गेल्या, चाकूनेही हल्ले झाले आणि अनेक स्फोटही झाले. कारागृहातील ‘लॉस लोबोस’ आणि ‘लॉस चोनेरोस’ टोळ्यांमध्ये ही हिंसक चकमक झाली. दूरचित्रवाणीवर दाखवलेल्या चित्रांमध्ये कैद्यांना कारागृहाच्या खिडक्यांमधून गोळीबार करताना पाहिले जाऊ शकते. गुआस सरकारने आपल्या ट्विटर अकाऊंटवर काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये सहा स्वयंपाकींना तुरुंगाच्या एका भागातून बाहेर काढताना दिसत आहे.

    पोलीस काय म्हणाले?

    या प्रकरणातील प्रादेशिक पोलीस कमांडर जनरल फॉस्टो बुएनो यांनी सांगितले की, बंदुकीच्या गोळ्या आणि ग्रेनेड स्फोटांमुळे कैद्यांचा मृत्यू झाला. कारागृह ब्युरोचे ट्विट अध्यक्ष गुइलेर्मो लासो यांनी रिट्विट केले आणि म्हटले की, “मंगळवारच्या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे. येथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात देशातील एका कारागृहात झालेल्या हिंसक चकमकीत 100 हून अधिक कैदी मारले गेले होते. कारागृहातील हिंसाचाराशी संबंधित घटना येथे वारंवार घडत असतात.

    तुरुंगात सतत एवढा हिंसाचार का?

    इक्वेडोरची कारागृहे ही ड्रग्ज टोळ्यांशी संबंधित असलेल्या कैद्यांसाठी युद्धभूमीसारखी आहेत. ग्वायाकिल हे इक्वेडोरचे मुख्य बंदर शहर आहे. कोकेन उत्तरेकडे विशेषत: अमेरिकेत पाठवण्याचे हे एक प्रमुख केंद्र मानले जाते. गेल्या आठवड्यात पोलिसांनी ग्वायाकिल तुरुंगातून दोन पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, सुमारे 500 राऊंड दारुगोळा, एक हातबॉम्ब, अनेक चाकू, दोन डायनामाइट स्टिक्स आणि घरगुती स्फोटके जप्त केली.

    Ecuador violent riots between two gangs in prison 24 killed 48 other injured says police

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!