विशेष प्रतिनिधी
कोलंबो : श्रीलंकेत मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. खाजगी बँकांकडे आयातीसाठी परकीय चलन नसल्याने श्रीलंकेने अन्न संकटावर आणिबाणीची स्थिती जाहीर केली आहे. साखर, तांदूळ आणि इतर आवश्यक खाद्यपदार्थांचा साठा रोखण्यासाठी आपत्कालीन नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत, असे राष्ट्राध्यक्ष गोटाबया राजपक्षे यांनी सांगितले. Economic crisis in Sri Lanka, shortage of essential food items like sugar, rice, no foreign exchange for imports
भात, तांदूळ, साखर आणि इतर गह्याहकोपयोगी वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये समन्वय साधण्यासाठी राजपक्षे यांनी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला अत्यावश्यक सेवांचे आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे. दूध पावडर, रॉकेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या कमतरतेमुळे दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
दुसरीकडे साखर, तांदूळ, कांदा आणि बटाट्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यानंतर आणिबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंका सरकारने अन्नपदार्थांचा साठा रोखण्यासाठी जबर दंडाची तरतूद केली आहे. 2.1 कोटी लोकसंह्यया असलेला या देशावर कोरोना महामारीमुळे हे संकट कोसळले आहे.
श्रीलंकेत कोरोनामुळे दिवसाला 200 हून अधिक लोक मृत्युमुखी पडत आहेत. महामारीमुळे 2020 मध्ये श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत 3.6 टक्के घट झाली. गेल्या वर्षी मार्चमध्ये सरकारने परकीय चलन वाचवण्यासाठी आवश्यक मसाले, खाद्यतेल आणि हळदीसह वाहने आणि इतर वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली.
आमच्याकडे अन्न आणि औषध खरेदीसाठी पैसे नाहीत, असे आयातदार अजूनही म्हणतात. आयातदार हे खाद्यपदार्थ फक्त डॉलर्सने खरेदी करू शकतात. दोन आठवड्यांपूर्वी, श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने स्थानिक चलन मजबूत करण्यासाठी व्याजदर वाढवले.
Economic crisis in Sri Lanka, shortage of essential food items like sugar, rice, no foreign exchange for imports
महत्त्वाच्या बातम्या
- GST Collection In August : जीएसटी संकलनात ३०% ची मोठी वाढ, २ दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ४ आनंदाच्या बातम्या
- तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी
- मोदींच्या GDP तील वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol ची दरवाढ; २३ लाख कोटी रूपये गेले कुठे? राहुल गांधींची सरकारवर टीका