• Download App
    बलुचिस्तानला भूकंपाचा धक्का ,२२ ठार तर ३०० जखमी |Earthquake in Baluchistan kills several peopels

    बलुचिस्तानला भूकंपाचा धक्का ,२२ ठार तर ३०० जखमी

    विशेष प्रतिनिधी

    कराची – बलुचिस्तानातील हरनईसह सहा जिल्ह्यांत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यात २२ जण मृत्युमुखी पडले असून ३०० हून अधिक जखमी झाले. या भूकंपामुळे शेकडो घरांची पडझड झाली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टेर स्केलवर ५.९ इतकी नोंदली गेली.Earthquake in Baluchistan kills several peopels

    नागरिक गाढ झोपेत असताना अचानक जमीन हादरल्याने घबराट पसरली. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले.झोपेत असलेल्या नागरिकांना अचानक जमीन हलत असल्याचा भास झाला.



    त्यामुळे भयभीत होऊन घराबाहेर पळाले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हरनई येथे पंधरा किलोमीटर खोलीवर होता. बलुचिस्तानातील हरनई जिल्ह्याबरोबरच क्वेटा, सिबी, पिशीन, किला सैफुल्लाह, चमन, झियारत, झोओब या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले.

    बलुचिस्तानात यापूर्वी २०१३ रोजी अवरान जिल्ह्यात भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. त्यात सुमारे ८२५ नागरिकांचा मृत्यू झाला तर हजारो नागरिक जखमी झाले होते.

    Earthquake in Baluchistan kills several peopels

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत