• Download App
    अमेरिकेत नागरिकांचा लस घेण्यास विरोध, लशीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी चक्क चर्चमध्येच लसीकरण | Drop in vaccination in USA

    अमेरिकेत नागरिकांचा लस घेण्यास विरोध, लशीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी चक्क चर्चमध्येच लसीकरण

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : लस घेण्यासाठी सरकारकडून आग्रह होत असतानाही अमेरिकी नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे गेल्या दोन आठवड्यांमध्ये नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. Drop in vaccination in USA

    लोकांमधील गैरसमज दूर व्हावा यासाठी सरकारने आता काही राज्यांमध्ये चर्चच्या मदतीने चर्चच्या आवारातच लसीकरण केंद्र सुरु केली आहेत.नागरिकांच्या या वर्तणुकीमुळे डॉक्टर हताश झाल्याचे दिसत आहेत.



    न्यूयॉर्क शहरात एप्रिल महिन्यात दिवसाला एक लाख डोस दिले जात होते. पण आता दिवसाला केवळ १८ हजारच डोस दिले जात आहेत.अमेरिकेत आतापर्यंत फक्त ५६.२ टक्के नागरिकांनी लशीचा किमान एक डोस घेतला आहे.

    कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा प्रसार वाढत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. लशीबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज पसरले असल्याचा हा परिणाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘लस घेतली नाही तरी चालण्यासारखे आहे, इतकेच नाही तर तसे बायबलमध्येही सांगितले आहे,’

    अशाप्रकारची माहिती पसरत असून काही लोक त्यावर विश्वाअसही ठेवत आहेत. जवळपास २०० चर्चप्रमुखांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत सर्व ख्रिश्चेनांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. प्रोटेस्टंट पंथातील नागरिकांचा लसीकरणाला अधिक विरोध आहे.

    Drop in vaccination in USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या