विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : कोरोनाच्या रुग्णाला वेळेत व्हेंटिलेटरची सुविधा मिळाली तर त्याचे प्राण वाचू शकतात. परंतु, संख्या कमी असल्याने व्हेंटिलेटरवर कोणाला घ्यायचे ठरविणे अवघड होते. त्यासाठी एका भारतीय संशोधकाने एआय नावाचे टूल विकसित केले असून सिटी स्कॅन पाहून कोणत्या रुग्णाला व्हेंटिलेटरची सर्वाधिक गरज आहे हे यातून समजू शकणार आहे.Does the corona patient really need a ventilator? Indian researcher develops AI tool
केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे टूल विकसित केले आहे. चीनमधील वुहान आणि अमेरिकेतील रुग्णांच्या सिटी स्कॅनचा अभ्यास करून हे टूल बनविण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांचे स्कॅनिंग करून त्याचे मूल्यांकन होईल आणि रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज आहे का हे सांगेल.
संशोधन पथकाचे प्रमुख अमोघ हिरेमठ म्हणाले की रोगाचा प्रसार किती वेगाने होत आहे हे पाहून त्यासाठी औषधाची मात्राही या टूलद्वारे देण्यात येईल. केस वेस्टर्न रिझर्व मधील बायोमेडिकल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आणि सेंटर फॉर कॉम्प्युटेशनल इमेजिंग आणि पर्सनलाइज्ड डायग्नोस्टिक्सचे प्रमुख अनंत मादाभूशी यांनी सांगितले की, डॉक्टरांनी रुग्णांची कशा प्रकारची काळजी घ्यावी याचे नियोजन होऊ शकले तर जीव वाचविण्यासाठी ते प्रभावी ठरते. रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियाला व्हेंटिलेटरची गजर आहे का हे समजू शकणार आहे.
यामध्ये रुग्णालयातील कर्मचारी क्लाउड-आधारित अॅपवर छातीच्या स्कॅनची डिजीटल प्रतिमा अपलोड करतील. केस वेस्टर्न रिझर्वमध्ये या प्रतिमेचे स्कॅनिंग होऊन व्हेंटिलेटरची गरज आहे का हे सांगितले जाईल.
Does the corona patient really need a ventilator? Indian researcher develops AI tool
महत्त्वाच्या बातम्या
- पवारांनी कुठे पाठीत खंजीर खुपसला दाखवा?, असे म्हणणाऱ्या संजय राऊतांना चंद्रकांतदादांचा “या” अभ्यासाचा सल्ला
- Bengal By-Poll : ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवणार, टीएमसीची घोषणा- ‘भाजपने उमेदवार उभे करून पैसे वाया घालवू नये’
- Farmers Protest : राकेश टिकैत यांच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांचा पलटवार, म्हणाले- सरकारने 11 वेळा चर्चा केली, काही जण भ्रम पसरवत आहेत
- आता बिहार काँग्रेसमध्ये गदारोळ, हायकमांडने नवीन जम्बो टीमची घोषणा थांबवली, अहवाल वाचा