वृत्तसंस्था
लंडन : भारतीय बँकांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या attitude मध्ये अजूनही फरक पडलेला नाही. ब्रिटनने त्याला दिवाळखोरी जाहीर करून देखील त्याच्या उर्मट प्रवृत्तीत फरक पडलेला नाही. उलट त्याने एक ट्विट करून वादात आणखी भर घातली आहे. Despite being declared bankrupt by Britain, Vijay Mallya’s attitude is no different
भारतातल्या स्टेट बँकेचे माझ्यावरचे कर्ज ६२०० कोटी (सहा हजार दोनशे कोटी रुपयांचे) आहे. प्रत्यक्षात भारतात माझी 14 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी विविध तपास संस्थांनी जप्त केली आहे. आता स्टेट बँकेसह बाकीच्या संस्थांनी ६२०० कोटींची (सहा हजार दोनशे कोटीची) प्रॉपर्टी वगळता अन्य रक्कम सक्तवसुली संचालनालय संचालनालय अर्थात ईडीला परत करावी, असे उर्मट ट्विट विजय मल्ल्याने केले आहे.
विजय मल्ल्याला भारतात अटक होऊ शकते. त्याच्या विरोधात न्यायालयात खटला उभा राहू शकतो. हे टाळण्यासाठी विजय मल्ल्या भारतातून पळून गेला आहे. ब्रिटनमधल्या कोर्टात त्याने स्वतःच्या बचावाचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले. ब्रिटनने त्याला दिवाळखोर घोषित केले. भारताला त्याला सुपूर्त करण्याची प्रक्रियाही वेगात सुरू आहे. तरीदेखील त्याच्या उर्मट प्रवृत्तीत फरक पडलेला नाही, हे त्याच्या ट्विटवरून दिसून येते.
Despite being declared bankrupt by Britain, Vijay Mallya’s attitude is no different
महत्त्वाच्या बातम्या