• Download App
    कॅनडामध्ये कोरोना रोखण्यासाठी लष्कर तैनात|Deployed troops to prevent corona in Canada

    कॅनडामध्ये कोरोना रोखण्यासाठी लष्कर तैनात

    कॅनडातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या आयॅरिओ येथे कोरोनाचा कहर सुरू झाला असून कॅनडा सरकारने रेड क्रॉसच्या मदतीला आता लष्करालाही तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेडही मिळणे अवघड झाले आहे.Deployed troops to prevent corona in Canada


    विशेष प्रतिनिधी

    ओटावा : कॅनडातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या आयॅरिओ येथे कोरोनाचा कहर सुरू झाला असून कॅनडा सरकारने रेड क्रॉसच्या मदतीला आता लष्करालाही तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेडही मिळणे अवघड झाले आहे.

    कॅनडामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आटॅरिओ या प्रदेशात कोराना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी हवाई दलाच्या मदतीने विमानातून वैद्यकीय कर्मचारी आणि साहित्य पाठविले जात आहे.



    अटलांटिक या राज्यातून हे मनुष्यबपळ पाठविले जात आहे, असे कॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.कॅनडाच्या सार्वजनिक सेवा विभागाचे मंत्री बिल ब्लेअर यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून ओटॅरिओ राज्याला सर्व प्रकारची मदत केली जात आहे.

    आटॅरिओ येथे ८७७ कोरोना रुग्ण हे सध्या आयसीयूमध्ये आहेत. मे महिन्यापर्यंत ही संख्या १५०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. अल्बर्टा या राज्यात कोरोना वाढीचा वेग सर्वाधिक आहे.

    त्यामुळे याठिकाणी मांस पॅकींगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. याठिकाणी कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर केला नाही. त्यामुळे कोरोना वाढला असे म्हटले जात आहे.

    Deployed troops to prevent corona in Canada

     

    Related posts

    Harvard University : डोनाल्ड ट्रम्प हार्वर्ड विद्यापीठाचा करमुक्त दर्जा संपवणार; 2.2 अब्ज डॉलर्सची मदतही रोखली

    Argentina : अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा

    US threatens : हुथी बंडखोरांना पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेची इराणला धमकी; परिणाम भोगावे लागतील!