• Download App
    म्यानमारमधील हिंसाचार तातडीने रोखावा - गुटेरेस यांची जगाला विनवणी|Democracy sould be restore in Mynmar

    म्यानमारमधील हिंसाचार तातडीने रोखावा – गुटेरेस यांची जगाला विनवणी

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क – म्यानमारमधील अंतर्गत संघर्षाने भीषण रुप धारण करण्याआधीच आणि त्याचा परिणाम इतरांवर होण्याआधीच आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी केले.Democracy sould be restore in Mynmar

    म्यानमारमधील परिस्थितीबाबतचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केला असून त्यामध्ये गुटेरेस यांनी इतर देशांना आवाहन केले आहे. ‘म्यानमारमधील लष्कराला त्यांचे बस्तान बसविण्यापासून रोखण्याची संधी दिवसेंदिवस हातातून निसटत जात आहे.



    म्यानमारला पुन्हा लोकशाहीच्या मार्गावर आणण्यासाठी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे गुटेरेस यांनी अहवालात म्हटले आहे.
    म्यानमारमध्ये यावर्षी एक फेब्रुवारीला लष्कराने बंड करत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या हातून सत्ता हिसकावून घेतली होती.

    या लष्करशाहीविरोधात अद्यापही म्यानमारमध्ये जनतेचे आंदोलन सुरु आहे. सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षात आतापर्यंत ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी ‘आसियान’ देशांनी काही शिफारसी केल्या आहेत. तसेच, ब्रुनेईचे परराष्ट्र मंत्री एरिवन युसुफ यांची ‘आसियान’चे विशेष दूत म्हणूनही नियुक्ती केली आहे.

    Democracy sould be restore in Mynmar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Israel : इस्रायलने गाझाकडे जाणारे 13 जहाज रोखले:ग्रेटा थनबर्गसह 150 जणांना अटक; 30 मदत जहाजे अजूनही मार्गावर

    President Putin : रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले – भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, मी मोदींना ओळखतो, भारतीय अपमान सहन करत नाहीत

    Trump : अमेरिकन शेतकऱ्यांचे सोयाबीन विकत नसल्याने ट्रम्प त्रस्त, म्हणाले- मी लवकरच चीनच्या राष्ट्रपतींना भेटेन