• Download App
    कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा तब्बल ८५ देशांमध्ये संसर्ग, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा|Delta virus spread in 85 countries

    कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा तब्बल ८५ देशांमध्ये संसर्ग, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वांत संसर्गक्षम प्रकार ठरलेल्या ‘डेल्टा’ची ८५ देशांमध्ये उपस्थिती आढळून आली असून त्याचा आणखी काही देशांमध्ये प्रसार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.Delta virus spread in 85 countries

    जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक ४ लाख ४१ हजार ९७६ नवे रुग्ण आढळले (१४ ते २० जून). अर्थात, त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत या संख्येत ३० टक्क्यांनी घट नोंदविली गेली आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही (१६,३२९) भारतातच अधिक आहे. या संख्येतही ३१ टक्क्यांनी घट झाली आहे.



    भारतात सर्वप्रथम आढळून आलेल्या ‘डेल्टा’ विषाणूचा संसर्ग सर्वत्र वेगाने पसरत असून भारतात यामुळेच संसर्गाची दुसरी लाट आली होती. गेल्या दोन आठवड्यांतच तो ११ देशांमध्ये प्रथमच आढळून आला.

    जागतिक आरोग्य संघटना ‘अल्फा’, ‘बिटा’, ‘गॅमा’ आणि ‘डेल्टा’ या चार विषाणू प्रकारांमुळे होणाऱ्या संसर्गवाढीवर विशेष नजर ठेवून आहे. ‘अल्फा’पेक्षाही ‘डेल्टा’ अधिक संसर्गक्षम असून सध्याची स्थिती कायम राहिल्यास हा विषाणू प्रकार सर्वाधिक प्रभावी ठरेल, असा इशारा ‘डब्लूएचओ’ने दिला आहे.

    Delta virus spread in 85 countries

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या