विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – सार्वजनिक ठिकाणी प्रति वर्ग मैल एवढ्या अंतरात सर्वांत जास्त सीसी टीव्ही उभारलेले दिल्ली हे जगातील पहिले शहर ठरले आहे. राजधानीत प्रति वर्ग मैल क्षेत्रात एक हजार ८२६.६ सीसी टीव्हीअ लावले आहेत. Delhi became highest CCTV city in world
सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या शहरांची यादी ‘फोर्ब्स इंडिया’ने जाहीर केली आहे. यात जगातील १५० शहरांची तुलना केली असून दिल्लीला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे. यादीत भारतातील दिल्ली व्यतिरिक्त चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तेथे प्रति वर्ग मैल क्षेत्रात ६०९.९ कॅमेरे लावले आहेत तर आर्थिक राजधानी मुंबईत हेच प्रमाण १५७.४ कॅमेरे असे आहे. मुंबई १८व्या स्थानी आहे. सीसी टीव्हीच्या मुद्यावर दिल्लीने चीनमधील शेंनझेन (५२०.१), वुक्झी (४७२.७), क्विंगडाओ (४१५.८), शांघाय (४०८.५) या बड्या शहरांनाही मागे सोडले आहे. जगाचा विचार करता या शहरांमध्ये सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची संख्याल जास्त आहे.
याच श्रेणीत दिल्लीने लंडन, सिंगापूर, न्यूयॉर्क आणि मॉस्को आदी महानगरांवरही बाजी मारली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. ‘‘दिल्लीने प्रति वर्ग मैल क्षेत्रात सर्वाधिक सीसी टीव्ही कॅमेरे उभारण्यात शांघाय, लंडन, न्यूयॉर्क अशा शहरांना मागे टाकले, याचा अभिमान वाटत आहे.
Delhi became highest CCTV city in world
महत्त्वाच्या बातम्या
- संपादक, लेखक आनंद अंतरकर यांचे निधन
- पुणे महापालिकेचा तुघलकी आदेश, कोरोना नियमभंग करणाऱ्यांकडून दिवसाला दहा लाख रुपये वसूल करा
- मुख्यमंत्री खट्टर यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी म्हणाले – फिर खून बहाया किसान का
- स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात आधुनिक सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद