विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोना संसर्गस्थितीचा परिणाम शिक्षणावरही झाला असून गेल्या शैक्षणिक वर्षीच्या तुलनेत यावर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे.Decrease in students numbers in USA
‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट्स’ या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोना संसर्गस्थितीमुळे आलेल्या विविध अडचणींचा परिणाम म्हणून अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे या अहवालात म्हटले आहे. मात्र, ही संख्या पुन्हा वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
या वर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यांत ६२ हजार विद्यार्थी व्हिसा दिल्याचे आणि ही संख्या इतर कोणत्याही वर्षापेक्षा अधिक असल्याचे दिल्लीतील अमेरिकी दूतावासाने सांगितले. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती अद्याप अमेरिकेलाच असून त्यातही अमेरिकेतील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये चीननंतर भारतीय विद्यार्थ्यांचाच क्रमांक लागतो.
कोरोना परिस्थितीमुळे प्रवासावर अनेक निर्बंध आल्याने भारतातून अनेक विद्यार्थी अमेरिकेत जाऊ शकले नाही. अमेरिकेतही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १३ टक्क्यांनी घटली आहे तर, एकूणात अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १५ टक्क्यांनी घट झाली आहे.
Decrease in students numbers in USA
महत्त्वाच्या बातम्या
- हात-पाय नसलेल्याचा गाडी चालवितानाचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांचे मन द्रवले, नोकरीच दिली ऑफर
- मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेची खाती गोठवली, ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- लसीकरणाच्या नव्या गाईडलाइन्स : 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि बुस्टर डोस संदर्भात सोमवारी आरोग्य मंत्रालयाद्वारे नवीन गाइडलाइन्स जाहीर
- मुंबई, पुण्यात सुरू होणार फाईव्ह जी सेवा, दूरसंचार विभागाने दिली मंजूरी