• Download App
    इंडोनेशियाच्या माजी राष्ट्रपतीची मुलगी हिंदू धर्म स्वीकारणार, दिया मुतियारा सुकमावती यांचा इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय, 26 ऑक्टोबरला धर्मांतर सोहळाdaughter of Former Indonesian President Diya Mutiara Sukmavati Decided To Adopt Hinduism From Islam, Conversion Ceremony On 26 October

    इंडोनेशियाच्या माजी राष्ट्रपतीची मुलगी हिंदू धर्म स्वीकारणार, दिया मुतियारा सुकमावती यांचा इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय, 26 ऑक्टोबरला धर्मांतर सोहळा

     

    जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णे यांची मुलगी दिया मुतियारा सुकमावती यांनी इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सुकमावती सुकर्णोपुत्री म्हणूनही ओळखले जाते.daughter of Former Indonesian President Diya Mutiara Sukmavati Decided To Adopt Hinduism From Islam, Conversion Ceremony On 26 October


    वृत्तसंस्था

    जकार्ता : जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णे यांची मुलगी दिया मुतियारा सुकमावती यांनी इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सुकमावती सुकर्णोपुत्री म्हणूनही ओळखले जाते.

    धर्मांतर समारंभाचे प्रभारी आर्य वेदकर्ण म्हणाले की, 26 ऑक्टोबर रोजी बाली अगुंग सिंगराजा येथे शुद्धी वधनी नावाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये त्या हिंदू धर्म स्वीकारतील. धर्मांतर समारंभाच्या दिवशी सुकमावती यांचा ७०वा वाढदिवसही आहे.

    आजीच्या प्रेरणेने घेतला निर्णय

    सुकमावतीने यांनी त्यांच्या आजी दिवंगत इडा आयु न्योमन राय श्रीम्बेन (1881-1958) यांच्या प्रभावामुळे हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सुकमावती यांच्या वकिलांनी सांगितले की, याचे कारण त्यांच्या आजीचा धर्म आहे. सुकमावतींनी हिंदू धर्मशास्त्राचा चांगला अभ्यास केला आहे. बालीच्या त्यांच्या आधीच्या भेटीदरम्यान, सुकमावती अनेकदा हिंदू धार्मिक समारंभांना उपस्थित राहिल्या आणि हिंदू धार्मिक व्यक्तींशी संवाद साधला आहे.

    अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, सुकमावती यांची हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा त्यांचे भाऊ आणि बहीण – माजी राष्ट्रपती मेगावती सुकर्णोपुत्री, गुंटूर सुकर्नोपुत्र आणि गुरू सोकरनोपुत्र यांनी मान्य केली आहे. त्यांची मुले राजकुमार हर्यो पौंडर्जर्णा सुमौत्र जिवानेगरा, गुस्टी राडेन आयु पुत्री सिनीवती आणि मुहम्मद पुत्र पेरविरा उतामा यांनीही धर्मांतरास मान्यता दिली आणि स्वीकारली.

    daughter of Former Indonesian President Diya Mutiara Sukmavati Decided To Adopt Hinduism From Islam, Conversion Ceremony On 26 October

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Repatriates : भारत सरकार थायलंडमधून 500 भारतीयांना परत आणणार; म्यानमार सैन्याने घोटाळा केंद्रांवर छापे टाकले तेव्हा थायलंडला पळून गेले होते

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम