Covid Vaccine : ब्राझीलमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिन उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकबरोबरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, नियंत्रक कार्यालयाच्या सूचनेनुसार कोव्हॅक्सिनचा करार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Covid Vaccine Big blow to Bharat Biotech, Brazil suspends Covid Vaccine deal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ब्राझीलमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिन उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकबरोबरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, नियंत्रक कार्यालयाच्या सूचनेनुसार कोव्हॅक्सिनचा करार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फेडरल सरकारने लसीसाठी पैसे दिले नाहीत – ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष
सीजीयूने केलेल्या प्राथमिक विश्लेषणानुसार, करारामध्ये कोणतीही अनियमितता नाही, परंतु पालन करण्याच्या सखोल विश्लेषणासाठी, करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असेही म्हटले आहे की, आतापर्यंत या लसीसाठी ब्राझीलच्या आरोग्य नियामक एजन्सी एएनव्हीआयएसएची मंजुरी मिळालेली नाही. यापूर्वी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सेनारो यांनी स्पष्टीकरणात म्हटले होते की, कोव्हॅक्सिन लसीसाठी फेडरल सरकारने कोणतीही रक्कम दिलेली नाही.
ब्राझीलमध्ये असे आरोप लावले गेले आहेत की बोल्सनारो सरकारने कमी किमतीचा पर्याय असतानाही तेथे अधिक किंमतीला लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधी लुईस मिरांडा आणि त्यांचे बंधू लुईस रिकार्डो मिरांडा यांनी याप्रकरणी संसदीय समितीसमोर तक्रार दाखल केली. त्याचवेळी आरोग्य मंत्रालयाच्या एका माजी कर्मचाऱ्यानेसुद्धा असा आरोप केला की, त्याच्यावर हा व्यवहार जास्त किमतीवर करण्याचा दबाव होता.
2 कोटी लस खरेदीच्या करारावर फेब्रुवारीमध्ये स्वाक्षरी
ब्राझीलने भारत बायोटेक कंपनीबरोबर फेब्रुवारी 2021 मध्ये दोन कोटी लस खरेदी करण्याचा करार केला होता. यासाठी ब्राझीलला सुमारे 2400 कोटी रुपये द्यावे लागणार होते. या व्यवहारात ब्राझिलियन कंपन्या प्रीसिझा मेडिकॅमेन्टोस भागीदार आहेत. तथापि, ब्राझीलमध्ये बर्याच काळापासून भारतीय कोव्हॅक्सिन लसीच्या पुरवठ्यावरून राजकारण सुरू आहे. अनेक महिने प्रयत्न करूनही आणि आवश्यक कागदपत्रे देऊनही नियमकांनी या लसीला परवानगी दिली नाही. अशा परिस्थितीत हा करार अयशस्वी होण्याच्या पडद्यामागील इतर प्रतिस्पर्धी लस निर्मात्यांचीही भूमिकाही नाकारता येणार नाही.
ब्राझीलमधील कोरोना व्यवस्थापनासंदर्भात राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो आधीपासूनच वादात आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर चहुबाजूंनी हल्ला चढवलेला आहे.
Covid Vaccine Big blow to Bharat Biotech, Brazil suspends Covid Vaccine deal
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Update : कोरोना संसर्गाचा वेग झाला कमी, सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारांहून कमी रुग्णांची नोंद, 24 तासांत 817 मृत्यू
- Raj Kaushal Death : प्रसिद्ध अभिनेती मंदिरा बेदींचे पती राज कौशल यांचे हार्ट अटॅकने निधन
- जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत पॉलिटिकल ड्रामा, बनावट उमेदवाराचा फिल्मी स्टाइल भंडाफोड
- कोरोना काळात भारताच्या मदतीसाठी अमेरिकेचा पुढाकार, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजनी संमत केला ठराव
- तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तारखा सांगणे चुकीचे – पॉल यांचे मत