विशेष प्रतिनिधी
बीजिंग – चीनमधील झेजीयांग या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रांतामध्ये कोरोना संसर्ग पसरला आहे. त्यामुळे सुमारे पाच लाख लोकांना क्वारंटाइन करण्यात आले. गेल्या आठवड्याच्या सुरवातीपासूनच रुग्णांचा आकडा आता दोनशे झाला आहे.Corona spreding fastly in China
क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या चार लाख ४० हजार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.इतर काही देशांच्या तुलनेत चीनमधील रुग्णांचा आकडा कमी असला तरी बीजिंगमध्येही संसर्ग पसरला आहे.
त्यामुळे अधिकाऱ्यांनी सामुहिक चाचण्या तसेच लॉकडाउन या उपायांचा अवलंब केला आहे. हिवाळी ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात आहे.तियानजीतमध्ये ओमीक्रॉनचा पहिला रुग्ण सोमवारी आढळला.
त्यानंतर अधिकारी दक्ष झाले आहेत. गेल्या काही दिवसांत निंगबो या बंदरासह शाओशींग शहरात काही व्यापारी कार्यालये बंद करण्यात आली.
Corona spreding fastly in China
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रम्होस क्षेपणास्त्र आता थेट चीन सीमेवर पोहोचू शकणार, चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
- निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षण मुद्यावरून घोळ, राज ठाकरे यांचा राज्य आणि केंद्र सरकारवर आरोप
- चरणजीत सिंग चन्नी आता केवळ नाईट वॉचमन, सिध्दूंना कॉँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष केल्यावर कॅ. अमरिंदर सिंग यांची टीका
- जातीनिहाय जनगणना अहवालात इतर मागासवर्गीयांचा समावेश नव्हता, त्रुटी असल्यानेच सादर केला नसल्याचे केंद्राचे न्यायालयात स्पष्टीकरण