• Download App
    जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले, २४ तासांत ५० हजार जणांना लागण |Corona speed in Germany once again

    जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले, २४ तासांत ५० हजार जणांना लागण

    वृत्तसंस्था

    बर्लिन – युरोपात विशेषत: जर्मनीत कोरोनाने पुन्हा हाहाकार माजविला आहे. गेल्या चोवीस तासात ५० हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दीड वर्षातील हा सर्वोच्च आकडा मानला जात आहे. तसेच चोवीस तासात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे.Corona speed in Germany once again

    जर्मनीचे नामांकित ख्रिश्चि.यन ड्रॉस्ट्रन यांनी आगामी काळात मृतांचा आकडा एक लाखांचा आकडा पार करेल, अशी भीती व्यक्त केली. जर्मनीच्या सॅक्सोनी राज्यात पॉझिटिव्हीटीचा दर सर्वाधिक आहे. गेल्या सात दिवसात दररोज एक लाख लोकांमागे ४५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या राज्यात लस न घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.



    लसीकरणाचा दर हा ७० टक्कयांपेक्षा कमी असल्यामुळे सरकारकडून लस घेण्याबाबत वारंवार आवाहन केले जात आहे. लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी आगामी काळात संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    सप्टेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. अनेक राजकीय पक्षांनी लसीकरणाला विरोध केला आहे. सत्तेत आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे लॉकडाउन लागू केला जाणार नाही, असे या पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

    Corona speed in Germany once again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने जपानमधून टायफून क्षेपणास्त्र प्रणाली काढावी; यामुळे प्रदेशाच्या सुरक्षेला धोका

    Trump : ब्रिटनच्या शाही राजवाड्यात ट्रम्प यांचे भव्य स्वागत; किंग चार्ल्ससोबत सोन्याच्या बग्गीतून प्रवास

    Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही