• Download App
    अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक, दैनंदिन लाखांवर रुग्ण, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या प्रमाणात ५०० टक्यांनी वाढ|Corona outbreak in US, millions of patients daily, 500 percent increase in hospital admissions

    अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक, दैनंदिन लाखांवर रुग्ण, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या प्रमाणात ५०० टक्यांनी वाढ

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक झाला असून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांवर गेली आहे. रुग्णालयात दाखल होणाºयांच्या प्रमाणात ५०० टक्यांनी वाढ झाली आहे. रुग्णालयांवर यामुळे प्रचंड ताण आला आहे. आरोग्य कर्मचाºयांमध्येही कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. मार्चनंतर प्रथमच दररोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत.Corona outbreak in US, millions of patients daily, 500 percent increase in hospital admissions

    दक्षिणेकडील राज्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण जास्त आहे. या राज्यांत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर मास्क वापरण्याबाबत दूर्लक्ष केले जात आहे. या राज्यांतील अतिदक्षता विभागांत (आयसीयू) जागा मिळेनासी झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या लाटेमुळे रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच परिचारिकांची कमतरता भासू लागली असून त्यामुळे उपचार करणेही अवघड झाले आहे. आयसीयूची गरज असूनही अनेकांना वेळेत मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे या रुग्णांची काळजी घेणेअवघड झाले आहे.



    अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाच्या आकडेवारीनुसार फ्लोरिडामध्ये १६,४५७ रुग्ण रुग्णालयांत दाखल आहेत. त्यानंतर टेक्सास राज्यांत राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत.कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे.

    अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे.

    अमेरिकेतील फ्लोरिडा हे कोरोनाचे हॉटस्पॉट झालं आहे. मध्य फ्लोरिडामध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेहांसाठी जागाच शिल्लक नाही. शवागृहात मृतदेहांचा खच पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लहान मुलांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त धोका असणाºया भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

    Corona outbreak in US, millions of patients daily, 500 percent increase in hospital admissions

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही