विशेष प्रतिनिधी
जाकार्ता – इंडोनेशियात गेल्या काही आठवड्यात कोरोनामुळे शेकडो मुलांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक मुले पाच वर्षांखालील होती. कोरोनामुळे मुलांमधील हा मृत्यूदर जगात मोठा आहे आणि मुलांना कोरोना सर्वांत कमी धोका असल्याच्या आतापर्यंतच्या निरीक्षणालाही हा धक्का मानला जात आहे. Corona kills hundreds of children in Indonesia, raising world concern
इंडोनेशियात जुलैमध्ये दर आठवड्याला शंभरपेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक असताना या साथीत मुलांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. इंडोनेशियात गेल्या शुक्रवारी कोरोनाचे ५० हजार नवे रुग्ण आढळले तर एक हजार ५६६ जणांचा मृत्यू झाला.
बालरोगतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनारुग्णांच्या एकूण संख्येत १२.५ टक्के एवढे प्रमाण मुलांचे आहे. गेल्या काही महिन्यांपेक्षा यावेळी त्यात वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. १२ जुलैच्या आठवड्यात १५० मुलांचा कोरोनाने मृत्यू झाला. पाच वर्षांखालील बालकांची संख्या यात निम्मे आहे.
इंडोनेशियाने या महिन्यात रोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत व ब्राझीलला मागे टाकले आहे. या जागतिक साथीचे नवे केंद्रबिंदू हा देश ठरला आहे. आज रुग्णालयात दाखल रुग्णांच्या बचावासाठी अथक प्रयत्न सुरू होते. मृत्यूसंख्या एक हजार ३३८ नोंदविली गेली.
Corona kills hundreds of children in Indonesia, raising world concern
महत्त्वाच्या बातम्या
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भारताकडे येणार, समतोलासाठी उपयुक्त बाब
- १५५ किलोमीटर वेगाने घोंघावणाऱ्या ‘इन-फा’ वादळाचा चीनला तडाखा, शेकडो विमाने रद्द
- अबुधाबीतील भारतीय वंशाचे उद्योजक युसुफअली यांच्या शिरपेचात मानाचा तुरा
- सप्टेंबरच्या अखेरपर्यंत लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होणार – डॉ. गुलेरिया यांचा अंदाज