• Download App
    अमेरिका, न्यूझीलंड, जपान, ऑस्ट्रेलियात पुन्हा वाढू लागले कोरोनाचे रुग्ण, लॉकडाउन होणार अधिक कडक|corona is increasing in USA, Japan, Newzeland

    अमेरिका, न्यूझीलंड, जपान, ऑस्ट्रेलियात पुन्हा वाढू लागले कोरोनाचे रुग्ण, लॉकडाउन होणार अधिक कडक

    विशेष प्रतिनिधी

    वेलिंग्टन – न्यूझीलंडमध्ये नव्याने ६३ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. एका दिवसात आढळून येणारी ही रुग्णसंख्या गेल्या दीड वर्षातील सर्वाधिक मानली जात आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून देशात लॉकडाउन आणखी कडक करण्यात आले आहे.corona is increasing in USA, Japan, Newzeland

    दरम्यान अन्य देशातही कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. अमेरिकेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १.७० लाखावर पोचली आहे. हा आकडा दोन लाखांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात चोवीस तासात ९७८ रुग्ण आढळले. जपानमध्ये ऑलिंपिक स्पर्धा संपल्यानंतर नव्या रुग्णांच्या संख्येने २५ हजाराचा आकडा पार केला आहे.



    न्यूझीलंड सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन शुक्रवारपर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, देशात डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्ण वाढलेले आहेत. गेल्या आठवड्यात एक रुग्ण सापडला आणि त्यानंतर संख्येत भर पडत गेली. गेल्या आठवड्यात एकूण १४९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

    पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी म्हटले की, कोविडची वाढती संख्या पाहता ऑकलंडमध्ये या महिनाअखेरपर्यंत लॉकडाउन कायम राहील. कारण बहुतांश रुग्ण याच भागातील आहेत. जेसिंडा म्हणाल्या की, कोरोना व्हेरियंटची माहिती घेणे सुरू आहे. आपण अधिक सजगता बाळगणे गरजेचे आहे. डेल्टा व्हेरियंटवरून कोणताही निष्काळजीपणा नको, असे त्यांनी नमूद केले.

    corona is increasing in USA, Japan, Newzeland

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या