वृत्तसंस्था
न्यूयॉर्क – कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागल्याने अमेरिका पुरती हादरली आहे. अमेरिकेने कोरोना संसर्गाची लाट पुन्हा एकदा तीव्र होत असून दिवसभरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. Corona erupts in USA once again
गेल्या हिवाळ्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. सध्या ४४ हजार जण उपचार घेत असून जूनच्या तुलनेत ही संख्या ३० टक्क्यांनी अधिक आहे. दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळे दररोज सरासरी २७० जणांचा मृत्यू होत होता, आता ही संख्या ५०० च्या पुढे गेली आहे.
अत्यंत संसर्गक्षम असलेला कोरोनाचा ‘डेल्टा’ या प्रकाराचा प्रसार आणि देशाच्या दक्षिण भागात लसीकरणाचा अत्यंत कमी वेग ही दोन कारणे संसर्गवाढीस कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोकांनी लस घेण्यात टाळाटाळ केल्यास रुग्णालयात भरती होणाऱ्यांची आणि मरण पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अमेरिकेत सध्या ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून ७० टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. देशाच्या दक्षिण भागात लसीकरणाचा वेग कमी आहे. देशातील उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी ४१ टक्के रुग्ण याच भागामधील राज्यांतील आहे.
Corona erupts in USA once again
- कोविन अॅप जबरदस्त, कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केले मोदी सरकारचे कौतुक
- महापुराच्या मदतीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, लाँगटर्म योजना करत आहोत, काही वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल !
- केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी
- पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत open debate; रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख सहभागी होणार