विशेष प्रतिनिधी
रशिया : रशियात कोरोना वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे.रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नॉन वर्किंग विकची घोषणा केली आहे. सर्व कामगारांना भरपगारी रजा देण्यात येणार आहे. चीनमध्येही कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने शाळा बंद ठेऊन विमानाची उड्डाणे रद्द केली आहेत.Concerns over increased corona outbreak in Russia, announcement of non-working week, paid leave for workers
कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेल्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या घोषणेनंतर मॉस्कोमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी म्हटले आहे की, सर्व दुकाने, बार व रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद असतील.
केवळ सुपरमार्केट आणि फार्मसी सारख्या अत्यावश्यक दुकानांनाच खुले राहण्याची परवानगी असेल. पुतिन यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार नॉन वर्किंग विकचा प्रस्ताव दिला आहे.
रशियामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोविड -19 मुळे 1,028 लोकांचा मृत्यू झाला.
महामारीच्या प्रारंभापासून एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. पुतिन म्हणाले की, ते 30 ऑक्टोबर रोजी नॉन वर्किंग विक सुरू करण्याच्या आणि पुढील आठवड्यापर्यंत वाढविण्याच्या मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला पाठिंबा देत आहेत. वास्तविक, 30 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्याच्या पुढील आठवड्यातील सात दिवसांपैकी पहिले 4 दिवस सरकारी सुट्ट्या आहेत.
Concerns over increased corona outbreak in Russia, announcement of non-working week, paid leave for workers
महत्त्वाच्या बातम्या
- शाहरूखच्या मन्नतवर छाप्याचा मीडियाकडून ब्रभा; प्रत्यक्ष छापा नाही, फक्त आर्यनशी संबंधित कागदपत्रे नेली!!
- युनिव्हर्सल पास असेल तरच लोकलचा पाससाठी परवानगी मिळणार; बोगस प्रमाणपत्रांना आळा
- वर्दीतली आई ! लेकराला पोटाला बांधून DSP डूट्यीवर तैनात ! शिवराजसिंग म्हणाले-मध्यप्रदेशको आपपर गर्व है!
- जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून 7 तास चौकशी, तपास यंत्रणेचा दावा – सुकेशने अभिनेत्रीला महागडी कार केली होती गिफ्ट