• Download App
    नेपाळच्या राजकारणात भूकंप, विरोधी कम्युनिस्ट पक्षात उभी फूट | Communist party break in two fraction I Nepal

    नेपाळच्या राजकारणात भूकंप, विरोधी कम्युनिस्ट पक्षात उभी फूट

    विशेष प्रतिनिधी

    काठमांडू – ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ – युनिफाईड मार्क्सिसिस्ट लेनिनिस्ट’ (सीपीएन-यूएमएल) या नेपाळमधील सर्वांत मोठ्या कम्युनिस्ट पक्षात असलेल्या अंतर्गत वादामुळे फूट पडली आहे. या पक्षाचे एक नेते माधवकुमार नेपाळ यांनी नव्या राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे. Communist party break in two fraction I Nepal

    माधवकुमार नेपाळ आणि माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यात प्रचंड वाद आहेत. ओली यांचे सरकार पाडण्यासाठी नेपाळ यांनी तत्कालीन विरोधकांशी हातमिळवणीही केली होती. ओली यांनी तीन दिवसांपूर्वीच नेपाळ आणि त्यांच्या १३ सहकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.



    नेपाळच्या अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी राजकीय पक्ष कायद्यात सुधारणा करण्यासाठीची अधिसूचना जारी केली. यामुळे एखाद्या पक्षाच्या संसदीय पक्षाचे वीस टक्क्यांहून अधिक सदस्यांना एकत्र येऊन वेगळा पक्ष स्थापन करायचा असल्यास त्याला मान्यता दिली जाणार आहे.

    राजकीय पक्षांचे विभाजन सोयीचे करणाऱ्या या अधिसूचनेला सरकारने पाठबळ दिल्यानंतर माधवकुमार नेपाळ यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करत ‘सीपीएन-यूएमएल (समाजवादी)’ या नावाने पक्षाची नोंदणी करण्याची विनंती केली.

    Communist party break in two fraction I Nepal

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Actor Dileep : मल्याळम अभिनेता दिलीपची रेप केसमधून मुक्तता; केरळ न्यायालयाने 6 जणांना दोषी ठरवले; 2017 मध्ये चालत्या कारमध्ये गँगरेप

    UK PM Starmer : ब्रिटिश पीएम स्टार्मर म्हणाले- युक्रेनचे निर्णय तेच घेतील; झेलेन्स्कींना म्हणाले- आम्ही तुमच्यासोबत आहोत; लंडनमध्ये युरोपीय नेत्यांची गुप्त बैठक

    Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीच्या लहान लाटा; 50 किमी खोलीवर होते केंद्र