• Download App
    अमेरिकी गुप्तहेर संस्था सीआयएच्या संचालकांनी तालिबानचा म्होरक्या बरदारची घेतली गुप्त भेट, जाणून घ्या काय आहे कारण? । CIA Director Burns Held A Secret Meeting In Kabul On Monday With Taliban Leader Abdul Ghani Baradar

    अमेरिकी गुप्तहेर संस्था सीआयएच्या संचालकांनी तालिबानचा म्होरक्या बरदारची घेतली गुप्त भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

    CIA Director Burns : अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएचे संचालक विल्यम जे. बर्न्स यांनी 23 ऑगस्टला तालिबानचे ज्येष्ठ नेते मुल्ला गनी बरादर यांची भेट घेतली. ही हायलेव्हल मीटिंग अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झाली. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर वॉशिंग्टन पोस्टला ही माहिती दिली आहे. CIA Director Burns Held A Secret Meeting In Kabul On Monday With Taliban Leader Abdul Ghani Baradar


    वृत्तसंस्था

    काबूल : अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएचे संचालक विल्यम जे. बर्न्स यांनी 23 ऑगस्टला तालिबानचे ज्येष्ठ नेते मुल्ला गनी बरादर यांची भेट घेतली. ही हायलेव्हल मीटिंग अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झाली. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर वॉशिंग्टन पोस्टला ही माहिती दिली आहे.

    तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान ताब्यात घेतला. याच्या दोन आठवडे आधी अमेरिकेने दोन दशकांनंतर आपले सैन्य मागे घेण्याची तयारी केली होती. अमेरिकेने आपले सैन्य 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला आणि तालिबान्यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर घनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेले.

    सीआयए आणि तालिबानदरम्यान ही उच्चस्तरीय बैठक अशा वेळी झाली आहे जेव्हा अमेरिका आपल्या लोकांना अफगाणिस्तानातून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी या बचाव मोहिमेचे वर्णन सर्वात मोठे आणि कठीण असे केले आहे. अशा स्थितीत अमेरिकेचे टॉप स्पाय काबूलला पाठवण्याच्या निर्णयाबाबत अनेक कयास बांधले जात आहेत.

    अमेरिकेनेही दिला इशारा

    यापूर्वी तालिबानने अमेरिकेला उघडपणे धमकी दिली होती. तालिबानचे प्रवक्ते सोहेल शाहीन यांनी सोमवारी म्हटले होते की, जर अमेरिकेने आपले सैन्य मागे घेण्यास विलंब केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. जर अमेरिकेने आपले सैन्य 31 ऑगस्टपर्यंत येथून माघारी घेतले नाही, तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

    15 ऑगस्टला तालिबानने केला कब्जा

    15 ऑगस्ट रोजी तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून परिस्थिती बिघडत चालली आहे. मोठ्या संख्येने लोक देश सोडून जात आहेत. लोक त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचत आहेत. काबूल विमानतळावर अमेरिकेचे सैन्य लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. अमेरिकन सैनिकांच्या मते, विविध देशांची विमाने आपल्या नागरिकांना घेऊन तेथून उड्डाण घेत आहेत.

    CIA Director Burns Held A Secret Meeting In Kabul On Monday With Taliban Leader Abdul Ghani Baradar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती