विशेष प्रतिनिधी
बीजिंग : चीन तसा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात असतोच. चिनी कंपन्या, चिनी माल तसा चर्चेत असतो. पण आता मात्र अशाच एका चिनी कंपनीने (China clothing brand) हद्दच केली आहे.Chinese clothing brand faces heat over inappropriate messages, anti-India depictions printed on kids’ shirts
लहान मुलांसाठी कपडे तयार करणाऱ्या या ब्रँडच्या अनेक उत्पादनांवर चिथावणीखोर आणि हिंसक मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळेच चीनमध्येही JNBYला विरोध झाला आहे. चिनी नागरिकांनी बहिष्काराचं अस्र उगारल्यानं JNBYनं माफी मागितली.
‘संपूर्ण जागा भारतीयांनी भरलेली आहे. मी ही बंदूक घेऊन त्यांचे तुकडे-तुकडे करेन,’ असा मजकूर JNBY नं तयार केलेल्या एका कपड्यावर इंग्रजी भाषेत छापण्यात आला आहे. दुसऱ्या एका कपड्यावर एका मुलाचं कार्टून छापण्यात आलं आहे. त्या मुलाच्या शरीरात असंख्य बाण घुसल्याचं दिसत आहे. ‘नरकात स्वागत आहे’, अशा आशयाचा मजकूरदेखील छापण्यात आला आहे.
JNBY नं डिझाईन केलेल्या कपड्यांवर चीनमध्ये प्रचंड टीका झाली आहे. चिनी सोशल मीडिया विवोवर लाखो लोकांनी JNBY विरोधात आवाज उठवला आहे. या कपड्यांवर ‘मला तुम्हाला स्पर्श करू द्या’, अशा आक्षेपार्ह मजकूरदेखील छापला गेला आहे. अशा प्रकारचा मजकूर कपड्यावर छापून JNBY चिनी मुलांच्या भविष्यावर विपरित परिणाम करत असल्याचा आक्षेप पालकांनी नोंदवला आहे. चीनमधल्या सरकारी माध्यमांनीदेखील या कपड्यांवरील मजकूराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Chinese clothing brand faces heat over inappropriate messages, anti-India depictions printed on kids’ shirts
महत्त्वाच्या बातम्या
- सेन्सेक्स 60 हजारी होण्याची रंजक कहाणी : मोदी पहिल्यांदा पंतप्रधान होताच 25 हजारांवर, दुसऱ्यांदा 40 हजारांवर गेला होता निर्देशांक
- “देहदंडाची शिक्षा व्हावी, म्हणजे परत कोणाची हिंमत होणार नाही!”, राज्यातील अत्याचाराच्या घटनांवर पंकजा मुंडेंचा संताप
- Emmy Awards 2021 : सुश्मिता सेनचा ‘आर्या’ बेस्ट ड्रामा सिरीजसाठी नॉमिनेट, अभिनेत्रीने शेअर केली खुशखबर
- 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरचा होणार भारतीय शेअर बाजार, जगातील 5वे सर्वात मोठे स्टॉक मार्केट होणार