• Download App
    चीनकडून तिसऱ्या महायुध्दासाठी कोरोना व्हायरसचा वापर, चीनच्या विषाणूतज्ज्ञांचा दावा|China's use of the corona virus for World War III, Chinese virologists claim

    चीनकडून तिसऱ्या महायुध्दासाठी कोरोना व्हायरसचा वापर, चीनच्या विषाणूतज्ज्ञांचा दावा

    चीन फार पूर्वीपासून तिसऱ्या महायुध्दाची तयारी करत होता. त्यामुळे या युध्दात जगाविरुध्द वापरण्यासाठी कोरोना व्हायरसचा बायोलॉजीकल वेपन म्हणून वापर करण्याचा चीनचा डाव होता, असा आरोप चीनेच्या विषाणूतज्ज्ञ डॉ. ली मेंग यांनी केलाआहे.China’s use of the corona virus for World War III, Chinese virologists claim


    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : चीन फार पूर्वीपासून तिसऱ्या महायुध्दाची तयारी करत होता. त्यामुळे या युध्दात जगाविरुध्द वापरण्यासाठी कोरोना व्हायरसचा बायोलॉजीकल वेपन म्हणून वापर करण्याचा चीनचा डाव होता, असा आरोप चीनेच्या विषाणूतज्ज्ञ डॉ. ली मेंग यांनी केलाआहे.

    इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाबद्दल बोलताना डॉ. मेंग म्हणतात, जगावर राज्य करण्यासाठी चीन बायोवेपन वापरण्याच्या चीनच्या कटाविरुद्धचा पुरावा म्हणून हा अहवाल उपयोगी ठरु शकतो.



    मी गेल्या जानेवारीपासून सांगत आहे की, हा विषाणू पीएलए या लॅबमधून आलेला आहे आणि या विषाणूच्या शोधासाठी चीनने मोठी गुंतवणूक केली आहे.

    त्यांना मोठ्या संशोधनातून माणसांना हानी पोहोचवणारा हा विषाणू सापडला आणि तो त्यांनी हेतुपुरस्सर जगभरात पसरवला. चीनच्या सरकारला हे बरोबर माहित आहे आणि म्हणूनच त्यांना काही वेळातच अपेक्षित परिणाम दिसू लागला.

    हा विषाणू चीनच्या शत्रू राष्ट्रांची वैद्यकीय व्यवस्था ढासळावी यासाठी पसरवण्यात आला असल्याचं अमेरिकेने सादर केलेल्या अहवालात नमूद केलं आहे. त्याविषयी बोलताना डॉ. मेंग म्हणतात, हा दावा नक्कीच खरा आहे.

    या अनियंत्रित अशा बायोवेपन्सचा वापर करुन वैद्यकीय व्यवस्थेवर हल्ला चढवला जातो. ह्या बायोवेपनने जास्त मृत्यू होणार नाहीत मात्र शत्रूराष्ट्रांची आरोग्य व्यवस्था ढासळेल आणि हाच उद्देश हा विषाणू पसरवण्यामागे होता.

    गेल्या वर्षी वुहानमध्ये या विषाणूची सामुदायिक चाचणी झाली आणि सगळाच गोंधळ उडाला.चिनी माध्यमांनी या अहवालाला कोणताही आधार नसल्याचा दावा केला आहे.

    त्याबद्दल त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, चिनी सरकारकडून याबद्दल देण्यात आलेला प्रतिसाद पाठ्यपुस्तकांमधूनही सांगण्यात आला आहे. मात्र, तो चुकीची माहिती देणारा आहे.

    China’s use of the corona virus for World War III, Chinese virologists claim

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या