• Download App
    अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन दाखविण्याचा चीनचा खोडसाळपणा, चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला कट|China's rudeness to show Arunachal Pradesh and Aksai Chin

    अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन दाखविण्याचा चीनचा खोडसाळपणा, चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला कट

    विशेष प्रतिनिधी

    बिजींग : भारताचा अविभाज्य भाग असलेला अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग हा चीनचा असल्याचे दाखविण्याचा कट चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला आहे. जागतिक पातळीवरील नकाशात हे दोन्ही प्रदेश चीनचे असल्याचे दर्शविणारे नकाशे जप्त करण्यात आले आहे.China’s rudeness to show Arunachal Pradesh and Aksai Chin

    चीनच्या सीमाशुल्क विभागाने नकाशांचे बॉक्स जप्त केले आहेत. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन हे चीनचे भाग असल्याचे दाखविले आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्याचबरोबर अक्साई चीनही आपला भाग दाखविला आहे.



     

    शाघांय विमानतळावर एक बॉक्स जप्त करण्यात आले. त्यामध्ये बेडशिट म्हणून पाठविण्यात येत असलेली ३०० पॅकेट जप्त करण्यात आली. त्यामध्ये बेडशिटच्या नावाखाली नकाशे होते. या नकाशांवर अरुणाचल आणि अक्साई चिनला भारताचा नव्हे तर चीनचा भाग दाखविला होता.

    नकाशे कोठे निर्यात करायचे आहेत याचा उल्लेख केला नाही. चीनने मानभावीपणा दाखवित हे नकाशे नष्ट करण्याचे ठरविले आहे. हे नकाशे बनविणाºया कंपनीला दंडही आकारण्यात येणार आहे.

    भारतीय प्रदेश आपला म्हणून दाखविण्याचा चीनचा हा पहिलाच प्रयत्न नाही. मार्च, 2019 मध्ये अरुणाचल प्रदेश हा भारतात नव्हे तर स्वतंत्र देश म्हणून दाखविला होता. त्यावेळीही ३० हजार नकाशे नष्ट करण्यात आले होते.

    चुकीच्या नकाशांसह एकूण 803 बॉक्स जप्त आणि नष्ट करण्यात आले. नकाशे एका गुप्त ठिकाणी नेले गेले आणि ते नष्ट केले गेले आहेत, असे चीनने म्हटले आहे.

    गेल्या आठवड्यात, चीनच्या खेळाडूंच्या आगमनादरम्यान प्रदर्शित झालेल्या नकाशामध्ये तैवान किंवा दक्षिण चीन समुद्राचा समावेश नसल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसारणावर चीनने एनबीसी युनिव्हर्सल चॅनेलवर टीका केली.

    China’s rudeness to show Arunachal Pradesh and Aksai Chin

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या