• Download App
    चीनचे तब्बल २१ हजार किलोचे ‘लाँग मार्च’ अखेर मालदीवजवळ हिंदी महासागरात कोसळले, शास्ज्ञांनी सोडला निश्वास|Chinas long march collapsed in sea

    चीनचे तब्बल २१ हजार किलोचे ‘लाँग मार्च’ अखेर मालदीवजवळ हिंदी महासागरात कोसळले, शास्ज्ञांनी सोडला निश्वास

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग : चीन अवकाश स्थानक उभारत असून त्याचे कोअर मोड्यूल घेऊन ‘लाँग मार्च ५ बी’चे २९ एप्रिलला प्रक्षेपण करण्यात आले होते. पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेलेल्या या प्रक्षेपकावरील नियंत्रण नंतर सुटल्याने ते वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होते.Chinas long march collapsed in sea

    ते कोठे कोसळणार, याबाबत जगभरातील खगोलशास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता आणि चिंता होती. अनियंत्रित झालेले चीनचे सर्वांत मोठे ‘लाँग मार्च ५-बी’ हे प्रक्षेपक अखेर मालदीव बेटांजवळ हिंदी महासागरात तुकडे होऊन कोसळले.



    २१ हजार किलो वजनाच्या या ‘लाँगमार्च’चा पृथ्वीकडे येतानाचा वेग ताशी तब्बल २८,००० किमी इता प्रचंड होता. तर कोसळतानाचा वेग प्रति सेकंद ८ किमी होता.

    शंभर फूट लांबीच्या आणि २१ टन वजनाच्या या प्रक्षेपकाचे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना हवेशी झालेल्या घर्षणामुळे या प्रक्षेपकाचे तुकडे होऊन बराचसा भाग नष्ट झाला आणि उरलेला भाग मालदीवजवळ ७२.४७ पूर्व रेखांश आणि २.६५ उत्तर अक्षांशावर समुद्रात कोसळला.

    अवकाश स्थानकासाठी कोअर मॉडेल घेऊन गेलेला प्रक्षेपक नष्ट झाला असला तरी हे कोअर मॉडेल अद्याप अवकाशातच फिरत आहे. हे १८ टन वजनाचे कोअर मॉडेलही पृथ्वीच्या वातावरणात शिरुन कोसळण्याचा अंदाज आहे.

    Chinas long march collapsed in sea

    महत्वाच्या  बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या