China Removes Actress Zhao Wei From Streaming Sites : प्रसिद्ध चिनी अभिनेत्री झाओ वेई तसेच झेंग शाँग यांच्यावर चिनी सरकारने कारवाई केली आहे. त्यांना इंटरनेटवरील सर्व प्लॅटफॉर्म हटवण्यात आले असून त्यांचे अनेक शो, वेब सिरीजही बंद करण्यात आल्या आहेत. China Removes Actress Zhao Wei From Streaming Sites and Social Media
वृत्तसंस्था
बीजिंग : प्रसिद्ध चिनी अभिनेत्री झाओ वेई तसेच झेंग शाँग यांच्यावर चिनी सरकारने कारवाई केली आहे. त्यांना इंटरनेटवरील सर्व प्लॅटफॉर्म हटवण्यात आले असून त्यांचे अनेक शो, वेब सिरीजही बंद करण्यात आल्या आहेत.
झाओ वेई ही अभिनेत्री शाओलिन सॉसर आणि नुकत्याच आलेल्या मुलानमध्ये झळकली होती. ती चीन तसेच हॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. झाओ वेईवर ही कारवाई करण्यामागे चिनी सरकारने कोणतेही ठोस कारण दिलेले नाही.
ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, झाओ वेई तसेच झेंग शाँग यांच्यावर करचोरी तसेच आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. दुसरीकडे, उद्योगपती जॅक मा यांच्या चित्रपट उद्योगाशी संबंधित एका कंपनीत झाओ वेई यांची भागीदारी असल्याचे सांगितले जात आहे. जॅक मावर यापूर्वीच चिनी सरकारने त्यांच्या सरकारविरोधी वक्तव्यामुळे फास आवळलेला आहे. आता तेथील मनोरंजन उद्योगातील सेलिब्रिटींविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे.
या बंदी घालण्यात आलेल्या दोन्ही अभिनेत्रींचे अनेक शो, वेब सिरीजमधील काम काढून घेण्यात आले आहे. एवढेच नाही, तर शोच्या अखेरीस येणाऱ्या श्रेयनामावलीतूनही त्यांचे नाव गायब करण्यात आले आहे. चीनच्या या विचित्र कारवाईची जगभरात चर्चा सुरू आहे.
China Removes Actress Zhao Wei From Streaming Sites and Social Media
महत्त्वाच्या बातम्या
- तामिळनाडू विधानसभेत कृषी कायद्यांविरुद्ध प्रस्ताव पारित, शेतकऱ्यांविरुद्ध नोंदवलेले सर्व गुन्हे परत घेणार, मुख्यमंत्री स्टालिन यांची घोषणा
- Coal Scam Case : कोळसा घोटाळ्यात तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला ED ने बजावले समन्स
- अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू, परिणामाची चर्चा कधी करत नाही, नाशकात संजय राऊतांचा राणेंवर निशाणा
- झटपट श्रीमंत बनण्याच्या नादात तरुणांचे कृत्य, 78 एसी चोरून भाजीपाल्यासारखे रस्त्यावर विकले, पाच जणांना अटक
- BH Series Registration Mark : वाहनांना मिळणार नवीन BH रजिस्ट्रेशन मार्क, ट्रान्सफरची प्रोसेसची होणार खूप सोपी