विशेष प्रतिनिधी
बीजिंग – चीनकडून भारताला सर्वाधिक धोका आहे, या सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी केलेल्या विधानावर चीनने आज जोरदार आक्षेप नोंदविला आहे. ‘कोणतेही कारण नसताना भारतीय अधिकारी चिनी सैन्याबाबत बागुलबुवा निर्माण करत आहेत.China objects on Indias stand
चीन आणि भारताने मिळून निश्चिित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा हा भंग आहे. भारतीय अधिकाऱ्यांचे असे वक्तव्य बेजबाबदार आणि धोकादायक आहे,’ असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने प्रसार माध्यमांबरोबर बोलताना सांगितले.
भारताच्या सुरक्षेला चीनपासून सर्वांत मोठा धोका आहे आणि सीमाप्रश्नीय दोघांमध्ये अविश्वाासाचे वातारण आहे, असे जनरल रावत म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा निषेध करताना चीनच्या प्रवक्त्याने, ‘आमचे सैनिक केवळ आमच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि शांतता कायम राखण्यासाठी सीमेवर तैनात आहेत,’ असा दावा केला.
China objects on Indias stand
महत्त्वाच्या बातम्या
- वाढत्या कोरोनामुळे जर्मनीकडून ट्रॅव्हल बॅन, इस्राईलमध्ये रुग्ण वाढल्याने आणीबाणी
- कोरोनाचा नवीन विषाणू लसीला दाद देत नसल्याचे स्पष्ट, सार जग पुन्हा धास्तावले
- भारताचा उदय होत असलेल पाहून अपचनचात्रास , उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची पाश्चात्य माध्यमांवर टीका
- बिहारमधील न्यायालयाचा देशासमोर आदर्श, बलात्कार प्रकरणातील आरोपीला एकाच दिवसात जन्मठेपेची शिक्षा