• Download App
    Covid Vaccine : कॅरेबियन देशाला अमेरिकेकडून लसीच्या ८० कुप्यांचे दान, चीनने उडवली खिल्ली | The Focus India

    Covid Vaccine : कॅरेबियन देशाला अमेरिकेकडून लसीच्या ८० कुप्यांचे दान, चीनने उडवली खिल्ली

    Covid Vaccine :  अमेरिकेने कॅरिबियन देश त्रिनिदाद अँड टोबॅगोला कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी फायझर लसीच्या 80 कुप्या दान केल्या आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी यावरून अमेरिकेची खिल्ली उडविली आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने चिनी सोशल मीडिया अॅप वीचॅटवर एकामागून एक दहा ट्विट केले आहेत. यामध्ये अमेरिकेची खिल्ली उडविण्यासह, ‘वर्स्ट पब्लिक रिलेशन अवॉर्ड ऑफ द इयर’साठी याची निवड केली जाईल का? असे विचारले आहे. China Mocks US Over Donation Of 80 Vials of Covid Vaccine to Trinidad and Tobago


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमेरिकेने कॅरिबियन देश त्रिनिदाद अँड टोबॅगोला कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी फायझर लसीच्या 80 कुप्या दान केल्या आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी यावरून अमेरिकेची खिल्ली उडविली आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने चिनी सोशल मीडिया अॅप वीचॅटवर एकामागून एक दहा ट्विट केले आहेत. यामध्ये अमेरिकेची खिल्ली उडविण्यासह, ‘वर्स्ट पब्लिक रिलेशन अवॉर्ड ऑफ द इयर’साठी याची निवड केली जाईल का? असे विचारले आहे.

    कोरोना संकटाला झुंज देणाऱ्या जगातील अनेक गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आपला प्रभाव वाढवण्यासाठी अमेरिका आणि चीन या देशांना लस देत आहेत. आपल्या बहुतांश लोकसंख्येला लस दिल्यानंतर अमेरिकेने घोषित केले की, ही लस उर्वरित जगाला दान केली जाईल. त्याच वेळी चीनने स्वत:च्या लसीचे दान करण्यास आधीच सुरुवात केली होती. या लस पाकिस्तान आणि नेपाळसारख्या देशांना देण्यात आल्या आहेत.

    देशाची लोकसंख्या 14 लाख

    गत आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते की, अमेरिका फायझर लसीचे 50 कोटी डोस 92 गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना देईल. त्रिनिदाद आणि टोबॅगोची लोकसंख्या सुमारे 14 लाख आहे. जेव्हा लोकांनी यावर ऑनलाईन टीका केली, तेव्हा स्पेनच्या अमेरिकन दूतावासाने ट्विट केले. यामध्ये असे म्हटले की ‘प्रत्येक डोस महत्त्वाचा आहे.’

    अमेरिकी दूतावासाचे ट्विट

    या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अमेरिकन सरकारने कोविड-19ची ही लस त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकारला दिली आहे. देणगीमध्ये फायझर लसीच्या 80 कुप्यांचा समावेश आहे. अमेरिका लसीकरणाच्या प्रयत्नांमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकारला मदत करण्यास वचनबद्ध आहे. आमचा विश्वास आहे की, प्रत्येक डोस महत्त्वाचा आहे. तथापि, नेटकरी या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत आणि इतक्या कमी प्रमाणात लसीवर टीका करीत आहेत. त्याच वेळी, त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकारकडून अद्याप यावर कोणतेही निवेदन आले नाही.

    China Mocks US Over Donation Of 80 Vials of Covid Vaccine to Trinidad and Tobago

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य