विशेष प्रतिनिधी
शांघाय: चीनने एकाच दिवसांत ७५ लाख लसी दिल्याने कोरोना लसीकरणातील २०० कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही माहिती दिली आहे.
मार्च महिन्याच्या अखेरिस पासून चीनने लसीकरण मोहिमेला वेग दिला. चीनला १०० दशलक्ष ते २०० दशलक्ष हा टप्पा गाठण्यासाठी फक्त २५ दिवसांचा कालावधी लागला होताChina has reached the stage of vaccination, giving 200 crore doses of corona vaccine so far
पुढील १०० दशलक्ष डोसचे लक्ष्य साध्य करण्यास १६ दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर ८०० ते ९०० दशलक्ष डोसचे लक्ष्य गाठण्यास फक्त सहा दिवसांचा कालावधी लागला. चीन सरकारने ही सर्वात मोठी लसीकरण असल्याचे म्हटले आहे. २१ जून २०२१ रोजी चीनने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला होता.
करोनाच्या संसगार्ला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांनी करोना लसीकरणावरही भर दिला आहे. करोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या चीनने करोनापासून बचाव करण्याच्या दृष्टीने मोठे उद्दिष्ट्य साध्य केले आहे.
चीनने आपल्या देशात लसीकरण मोहिमेला वेग दिला असून १०० कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मागील काही महिन्यांपासून चीनने लसीकरण मोहिमेला गती दिली होती.करोनाचा संसगार्ला सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यातच चीनने महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळवले होते.
त्यानंतर करोना चाचणी आणि लसीकरणावर भर दिला. करोनाचे वेगवेगळे वेरिएंट आढळत असताना चीनने लसीकरणाला गती दिली. करोनाच्या वेरिएंटपासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी लसीकरण मोहिम वेगाने सुरू झाली आहे. मात्र, २०० कोटी पैकी किती नागरिकांना दोन डोस देण्यात आले, याबाबतची कोणतीही माहिती चिनी प्रशासनाने दिली नाही.
China has reached the stage of vaccination, giving 200 crore doses of corona vaccine so far
महत्त्वाच्या बातम्या
- इराकचे सर्वोच्च शिया धर्मगुरु अल हकीम यांचे निधन
- तब्बल ५० हजार अफगाणी निर्वासितांना अमेरिका स्वीकारणार , अन्य देशही येणार पुढे
- सर्वसमावेशक सरकारला आकार देण्यात तालिबानला अद्यापही यश नाहीच
- निवडणूक आयोगा आला ममतादीदींच्या मदतीला धावून, भवानीनगरची पोटनिवडणूक होणार ३० सप्टेंबरला