• Download App
    चीन करू शकते अमेरिकेवर अणवस्त्र हल्ला! चीनच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने जुलैमध्ये घातली होती पृथ्वी प्रदक्षिणा|China could launch nuclear attack on US! China's hypersonic missile orbited the Earth in July

    चीन करू शकते अमेरिकेवर अणवस्त्र हल्ला! चीनच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने जुलैमध्ये घातली होती पृथ्वी प्रदक्षिणा

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग : थेट अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता चीनने मिळविल्याचा दावा अमेरिकेच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. गेल्या जुलैमध्ये चीनने हायपरसॉनिक शस्त्रांची चाचणी घेतली होती. या शस्त्रांनी पृथ्वी प्रदक्षिणा घातली होती. चीनने ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट अधिक वेगवान क्षेपणास्त्र लाँच केले होते.China could launch nuclear attack on US! China’s hypersonic missile orbited the Earth in July

    त्यामुळे चीन एखाद्या दिवशी अमेरिकेवरही अणवस्त्र हल्ला करू शकतो. चीनने मात्र हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याच्या वृत्ताचा इन्कार केला असून, पुन्हा वापरात येणाऱ्या अंतराळ यानाची ही चाचणी होती, असे म्हटले आहे.



    अमेरिकेच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे उपाध्यक्ष जनरल जॉन हायटेन यांनी म्हटले आहे की, चीनने २७ जुलै रोजी हायपरसॉनिक शस्त्राची चाचणी घेतली होती. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ही चाचणी होती. त्या क्षेपणास्त्राने संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. यावेळी हायपरसॉनिक ग्लाईड वाहन सोडण्यात आले होते. ते चीनमध्ये परतले.

    चीनच्या या शस्त्राचा निशाणा अनेक किलोमीटरने चुकला असला तरी एखाद्या देशाच्या हायपरसॉनिक शस्त्राने प्रथमच पृथ्वी प्रदक्षिणा केली. अमेरिकेच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे उपाध्यक्ष जनरल जॉन हायटेन यांनी म्हटले आहे की, चीन एखाद्या दिवशी अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करू शकेल, एवढी त्याची क्षमता आहे.

    चीनने मागील पाच वर्षांत शेकडो हायपरसॉनिक चाचण्या घेतल्या आहेत, तर अमेरिकेने केवळ ९ चाचण्या घेतल्या. चीनने मध्यम पल्ल्याचे हायपरसॉनिक शस्त्र तयार ठेवले आहे. अमेरिकेला यासाठी आणखी काही वर्षे लागू शकतात.

    चीनने १८ ऑक्टोबर रोजी चाचणीला दुजोरा दिला व याला फार महत्त्व देऊ नये असे म्हटले. ही नियमित चाचणी होती व ही क्षेपणास्त्राची चाचणी नव्हे अंतराळ यान होते, असे म्हटले आहे.

    China could launch nuclear attack on US! China’s hypersonic missile orbited the Earth in July

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या