वृत्तसंस्था
मॉस्को: आता लहान मुलांसाठी खास कोरोना लस तयार करण्यात आली आहे. ती इंजेक्शन स्वरूपात नसून नेझल स्प्रे स्वरूपात आहे. Children corona vaccination by Nasal spray
रशियामध्ये ही लस तयार केली असून सप्टेंबरमध्येच लाँच केली जाणार आहे, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. सध्या भारतात परवानगी मिळालेल्या रशियाची स्पुतनिक V लसच आहे. जी रशियाच्या गॅमेलिया इन्स्टिट्यूने तयार केली आहे.
गॅमेलिया इन्स्टिट्यूचे प्रमुख अॅलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितलं, आम्ही तयार केलेला नेझेल स्प्रे ही स्पुतनिक V लस आहे. ती फक्त इंजेक्शनऐवजी नोझलमार्फत दिली जाईल. 15 सप्टेंबरपासून ही लस उपलब्ध होईल.8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित आहे. या लशीची चाचणी केली आहे. कोणताही दुष्परिणाम दिसला नाही.
भारतातही मुलांना लस देणार ?
भारतातच तयार केलेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन लशीची लहान मुलांवर ट्रायल सुरू आहे. आठ आठवड्यात हे ट्रायल पूर्ण होणार आहे. रशियाच्या स्पुतनिक V लशीचाही चाचणीसाठी वापर लहान मुलांवरही होऊ शकतो.