• Download App
    चीनची लसदेखील प्रभावी नसल्याचा दावा, जनतेच्या आरोग्याबाबत प्रश्ननचिन्ह|Chians vaccine is week

    चीनची लसदेखील प्रभावी नसल्याचा दावा, जनतेच्या आरोग्याबाबत प्रश्ननचिन्ह

    विशेष प्रतिनिधी

    बुडापेस्ट – चीनने विकसीत केलेली सिनोफार्म ही कोरोना प्रतिबंधक लस ही फारशी प्रभावी ठरत नसल्याचे एका अभ्यासातून उघड झाले आहे. यामुळे ज्या देशांमध्ये या लशीचा वापर करून लसीकरण मोहिम राबविली गेली आहे, त्याठिकाणच्या जनतेच्या आरोग्याबाबत प्रश्नपचिन्ह उपस्थित केले जात आहे.Chians vaccine is week

    हंगेरीमध्ये याबाबतचा अभ्यास करण्यात आला. सिनोफार्म लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी विविध वयोगटातील ४५० जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यानुसार, वयाच्या पन्नाशीच्या आतीत नागरिकांना लशीमुळे ९० टक्के संरक्षण मिळते.



    मात्र, त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देताना प्रभाव कमी होत असल्याचेही आढळून आले आहे. ८० वर्षांपुढील नागरिकांमध्ये तर लस केवळ ५० टक्केच प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे.

    हा अहवाल ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला असून अद्याप इतर शास्त्रज्ञांनी त्याला मान्यता दिलेली नाही. चीनच्या आरोग्य यंत्रणेने या अहवालावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

    Chians vaccine is week

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या