• Download App
    अमेरिकेत कॅपिटल हिलवर कारने पोलीस अधिकाऱ्याला चिरडले; एकाचा मृत्यू, हल्लेखोरही गोळीबारात ठार । Capitol Police officer died after car rammed into security barricade in US

    अमेरिकेत कॅपिटल हिलवर कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला चिरडले; एकाचा मृत्यू, हल्लेखोरही गोळीबारात ठार

    अमेरिकन संसद भवन (कॅपिटल हिल) बाहेर एका कारचालकाने बॅरिकेडला धडक दिल्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडले. त्यात एक पोलीस अधिकारी ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. त्याचवेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर कारचालकही जखमी झाला, त्याचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. दुसऱ्या जखमी पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर यूएस कॅपिटलला लॉकडाऊन लावण्यात आले आहे. Capitol Police officer died after car rammed into security barricade in US


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमेरिकन संसद भवन (कॅपिटल हिल) बाहेर एका कारचालकाने बॅरिकेडला धडक दिल्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडले. त्यात एक पोलीस अधिकारी ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. त्याचवेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर कारचालकही जखमी झाला, त्याचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. दुसऱ्या जखमी पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर यूएस कॅपिटलला लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

    कारने चिरडण्याची आणि गोळीबाराची ही घटना कॅपिटल हिलजवळील सर्च पोस्टवर घडली. तीन महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या विजयाच्या संदर्भात मतदान करत असताना जमावाने अमेरिकेच्या कॅपिटल हिलमध्ये प्रवेश केल्याने झालेल्या हिंसेला यानिमित्त पुन्हा उजाळा मिळाला आहे.

    पोलिसांनी सांगितले की, दोन पोलीस अधिकाऱ्यांना एका वाहनातील व्यक्तीने धडक दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, असे दिसते की कारच्या चालकाकडे चाकू होता, त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला.

    त्याचबरोबर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृत पोलीस अधिकाऱ्याबद्दल शोक व्यक्त केला. हल्ल्यात ठार झालेले पोलीस अधिकारी विल्यम इव्हान्स यांनी कॅपिटल हिल वाचवण्यासाठी आपले प्राण दिले, असे त्या म्हणाल्या.

    Capitol Police officer died after car rammed into security barricade in US

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या