• Download App
    ब्रिटनमध्ये प्रौढांना बूस्टर अनिवार्य, पंतप्रधान जॉन्सन यांच्याकडून आणीबाणी जाहीर; Buter dose is compulsory in Briton

    ब्रिटनमध्ये प्रौढांना बूस्टर अनिवार्य, पंतप्रधान जॉन्सन यांच्याकडून आणीबाणी जाहीर;

    विशेष प्रतिनिधी

    लंडन – गेल्या वर्षापासून जगात धुमाकूळ घातलेल्या कोविड-१९ विषाणूच्या ओमीक्रॉन या नव्या प्रकाराने पुन्हा डोके वर काढले आहे. त्याच्या मुकाबल्यासाठी ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आणीबाणी जाहीर करीत सर्व प्रौढांना बूस्टर डोस अनिवार्य केला आहे Buter dose is compulsory in Briton

    जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस घेतल्यापासून तीन महिने उलटले असतील तर बूस्टरचे आरक्षण करता येईल. ३० वर्षांवरील व्यक्तींसाठी ही कालमर्यादा दोन महिन्यांची आहे.



    जॉन्सन यांनी वेस्टमीन्स्टर येथील लसीकरण केंद्राला भेट दिली. त्यांनी सांगितले की, किमान एक रुग्ण ओमीक्रॉनमुळे मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

    ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली. बूस्टर देण्याचा यामागील उद्देश आहे. ओमीक्रॉनमुळे उद्भवणाऱ्या सौम्य आजारांपासून बुस्टरमुळे संरक्षण मिळत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. त्यामुळे बुस्टरला असलेली मागणी वाढली असून त्यासाठी आरक्षण करण्याच्या यंत्रणेवर ताण पडला असून त्यात बिघाड होत आहेत.

    Buter dose is compulsory in Briton

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या