विशेष प्रतिनिधी
लंडन – ब्रिटनचे चॅन्सलर ऋषी सुनक यांनी नुकतेच महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ एका पाच पौंडांच्या विशेष नाण्याचे अनावरण केले. या नाण्यावर भारताचे राष्ट्रीय फुल असलेल्या कमळाचे चित्र असून गांधींजीचा संदेशही कोरलेला आहे.Briton issues coin on Mahatma Gandhi
हिना ग्लोव्हर यांनी या नाण्याचे डिझाईन केले असून ते सोने आणि चांदीमध्येही उपलब्ध आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणाऱ्या या महान नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी हे नाणे प्रकाशित केले असल्याचे सुनक यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये प्रथमच गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध केले जात आहे.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे नाणे प्रकाशित होणे महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच, भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंधही दृढ होत असल्याची ग्वाही यामुळे दिली गेली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
गांधीजींच्या या नाण्याची ऑनलाइन विक्री सुरु झाली असून दिवाळीनिमित्त देवी लक्ष्मीचा छाप असलेले एक आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे बारही ब्रिटन सरकारने जनतेला खरेदीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
Briton issues coin on Mahatma Gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दारूबंदी निर्णयावर ठाम
- खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध, शेतकरी आंदोलनात सहभागाचा संशय
- केंद्राने केले आता तुम्हीही करा, इंधनावरील १२ रुपये नफा कमी करून सवलत द्या, नवनीत राणा यांची मागणी
- शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले? चद्रकांत पाटील यांचा सवाल
- मुकेश अंबानी भारतातच राहणार, लंडनला स्थाईक होणार असल्याच्या अफवाच